शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित सौर कृषिपंप योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: October 1, 2015 00:22 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी तब्बल ९५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सौर कृषिपंप दिले जात आहेत.

शेतकऱ्यांमध्ये भीती : जनजागृती होणे अत्यंत गरजेचेलोकमत विशेषअमरावती : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी तब्बल ९५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सौर कृषिपंप दिले जात आहेत. मात्र या चांगल्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र उघड झाले आहे. एकदा सौर कृषिपंप घेतल्यास महावितरणकडून विजेवर चालणाऱ्या पंपासाठी जोडणी मिळणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे सौर कृषिपंप योजनेमधून सौर कृषिपंप घेण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. जिल्ह्याला या योजनेंतर्गत १७०० शेतकऱ्यांना सौर कृषिपंप वितरणाचे लक्ष्य देण्यात आले असून सप्टेंबर अखेरपर्यंत केवळ ७१ शेतकऱ्यांचे अर्ज महावितरणकडे प्राप्त झाले आहेत. विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे शेतकरी लाभार्थ्यांना सौरपंपाच्या एकूण किंमतीमधील ५ टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे. सौर ऊर्जेवरील कृषिपंपामुळे भारनियमन कमी दाब किंवा पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागणार नाही. एकूण किमतीच्या पाच टक्के रकमेत सौर ऊर्जेवरील कृषिपंप मिळणार आहेत. त्याचे दरमहा किंवा वार्षिक कोणतेही देयके येणार नाही. ५ एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसोबत ज्या गावात पारंपरिक विद्युतीकरण झालेले नाही, त्या गावातील शेतकरी सुद्धा या योजनेस पात्र ठरणार आहेत. त्यामुळे ही योजना सामान्यांना लाभदायी आहे. (प्रतिनिधी)या अटीमुळे झाला घोळसौर कृषिपंप घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी यापूर्वी शेतात वीज जोडणी घेतलेली नसावी. जर त्यांनी वीज जोडणी घेतली असेल तर त्यांना सौर कृषिपंप घेता येणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांना सौर कृषिपंप दिले जाणार आहेत त्यांना महावितरणकडून वीज जोडणी मिळणार नाही, अशी अट महावितरणने घातली आहे. नेमक्या याच अटीमुळे शेतकरी या योजनेत सहभागी होण्यास धजावत नाहीत. सौर ऊर्जेवरील कृषिपंप बंद पडल्यास अपेक्षित कार्यान्वयन न झाल्यास आपली परिस्थिती ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी होईल. सौर कृषिपंप बंद पडेल व त्यानंतर महावितरणकडून वीज जोडणीसुद्धा मिळणार नाही, या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे आणि त्यामुळेच मार्च २०१५ पासून सुरू झालेल्या या योजनेला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. ३ लाख २४ हजार रूपये किमतीच्या ३ एचपी सौर कृषिपंपासाठी शेतकऱ्यांना १६,२०० रूपये, ३ एचपी डीसी पंपासाठी २०,२५० रूपये भरावे लागणार आहेत.संबंधित एजंसीला आम्ही सौर कृषिपंप लावतेवेळी फक्त ८० टक्के रक्कम देणार आहोत. शेतकऱ्यांकडून आलेल्या अनुभवानंतर उर्वरित रक्कम त्या एजंसीला देण्यात येईल. सौर कृषिपंप बंद पडणार नाहीत. शेतकऱ्यांनी कुठलीही भीती बाळगू नये.- निलिमा गावंडे, उपअभियंता, महावितरण, अमरावती.