शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डेंटल कॉलेजसमोर बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

रविवार, १० मे रोजी सायंकाळपासून वादळ, पाऊस होता. काही तास वीज गूल होती. अशातच दंत महाविद्यालयासमोरील रहिवासी संजय मकेश्र्वर यांना घराच्या मागील संरक्षण भिंतीच्या चॅनेल गेटलगत आवाज आला. त्यावेळी वीज होती. अंधार नसल्याने मकेश्र्वर यांनी आपल्या तीनही मुलींना सोबत घेत त्या दिशेने बघितले असताना आवारातच बिबट दडून बसल्याचे दिसून आले. संजय मकेश्र्वर यांनी तत्क्षण मुलींना घरात घेतले. दार लावले.

ठळक मुद्देवनविभागाला दिली माहिती : घराच्या आवारात दिसून आल्याने काही क्षण उडाली भंबेरी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यापीठ परिसरात बिबट्याचा संचार ही नित्याचीच बाब असताना आता बिबट्याने नागरी वस्त्यांकडे धूम ठोकली आहे. येथील दंत महाविद्यालयासमोर संजय मकेश्र्वर यांच्या निवासस्थानाच्या आवारात बिबट दिल्याने अनेकांची भंबेरी उडाली. ही घटना रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास निदर्शनास आली. बिबट असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली.रविवार, १० मे रोजी सायंकाळपासून वादळ, पाऊस होता. काही तास वीज गूल होती. अशातच दंत महाविद्यालयासमोरील रहिवासी संजय मकेश्र्वर यांना घराच्या मागील संरक्षण भिंतीच्या चॅनेल गेटलगत आवाज आला. त्यावेळी वीज होती. अंधार नसल्याने मकेश्र्वर यांनी आपल्या तीनही मुलींना सोबत घेत त्या दिशेने बघितले असताना आवारातच बिबट दडून बसल्याचे दिसून आले. संजय मकेश्र्वर यांनी तत्क्षण मुलींना घरात घेतले. दार लावले. दाराच्या आवाजाने बिबट्याने संरक्षण भिंतीवरून चॅनेल गेट ओलांडून लांब उडी मारून पोबारा केला. मात्र, काही क्षण मकेश्र्वर कुटुंबीयांची भंबेरी उडाली होती, हे विशेष. दंत महाविद्यालय हा परिसर अमरावती विद्यापीठालगतच असल्यामुळे बिबट शिकारीच्या शोधात बाहेर आला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. घराच्या आवारात दडून बसलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे मोबाइलमध्ये कैद केल्याची माहिती विद्यापीठात शिपाईपदी कार्यरत संजय मकेश्र्वर यांनी दिली.विद्यापीठ एमबीए विभाग परिसरात तीन बिबटसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभाग परिसरात मंगळवारी रात्री ११ वाजतानंतर तीन लहान मोठे बिबट दिसून आल्याची माहिती एरिया आॅफिसर प्रमोद चव्हाण यांनी दिली. दरदिवशी विद्यापीठात रात्रीच्यावेळी सुरक्षेच्या अनुषंगाने गस्त घालत असताना मंगळवारी रात्री ११ वाजता दरम्यान एमबीए विभाग परिसरात वेगळा सुंगध आला. लांब उडी मारून नाल्याच्या दिशेने जाताना बिबट दृष्टीस पडला. मोर, रानगवा, माकड, श्वान या भागात मोठ्या संख्येने वावरत असल्यामुळे शिकारीसाठी बिबट्यांचे याच भागात वास्तव्य राहत असल्याचे विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी रवींद्र सयाम यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :leopardबिबट्या