दिरंगाई हा गुन्हाच संवेदनशीलता गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 06:00 AM2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:29+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लोकसंत गाडगेबाबा आदी थोर संतपरंपरा लाभलेल्या अमरावती जिल्ह्यात वेगवान विकास घडवून आणायचा आहे. हल्ली मंदीचा काळ सुरू आहे. त्यातही टेक्सटाईल क्षेत्रात मंदीचा प्रभाव अधिक आहे. अमरावती एमआयडीसीचा विकास रखडलेला आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील टेक्सटाईल पार्कमधील उद्योजकांनी त्यांचे कारखाने चीनमध्ये हलविण्याचा विचार सुरू केला आहे.

Late is a sensitivity to crime | दिरंगाई हा गुन्हाच संवेदनशीलता गरजेची

दिरंगाई हा गुन्हाच संवेदनशीलता गरजेची

googlenewsNext
ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांनी टोचले प्रशासनाचे कान : प्रथम आगमनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सामान्य जनतेच्या कामात केली जाणारी दिरंगाई हा गुन्हाच आहे, असे स्पष्ट करून प्रशासनाने सामान्यांच्या कामाबाबत संवेदनशीलता बाळगावी, अशी अपेक्षा कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांना संबोधित केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लोकसंत गाडगेबाबा आदी थोर संतपरंपरा लाभलेल्या अमरावती जिल्ह्यात वेगवान विकास घडवून आणायचा आहे. हल्ली मंदीचा काळ सुरू आहे. त्यातही टेक्सटाईल क्षेत्रात मंदीचा प्रभाव अधिक आहे. अमरावती एमआयडीसीचा विकास रखडलेला आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील टेक्सटाईल पार्कमधील उद्योजकांनी त्यांचे कारखाने चीनमध्ये हलविण्याचा विचार सुरू केला आहे. त्यांना थोपवून औद्योगिक वसाहतीतील हे कारखाने पुन्हा कसे गतिमान होतील, औद्योगिक क्षेत्राला चालना देऊन रोजगार, व्यापार या दृष्टीने कसे विकसित करता येईल, या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घ्यावयाचे आहेत, अशी कार्यरेखा त्यांनी स्पष्ट केली. ॉ
विमानतळ पूर्णत्वास नेणे, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावणे तसेच स्कील युनिव्हर्सिटी, तालुक्यांच्या एमआयडीसीमध्ये आॅटोमोबाइल उद्योगांची उभारणी करण्याचा मानस ना. ठाकूर यांनी व्यक्त केला.
आधार लिंकेज नसलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळण्यासाठी योग्य ते निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात चार दिवसांपासून सतत पाऊस कोसळला. गारपीट, पाऊस आणि त्यामुळे आलेल्या सर्द वातावरणामुळे झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यानिशी वास्तव मांडू. अधिकाधिक मदत शेतकºयांच्या पदरी पाडण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी माहिती ना. यशोमती ठाकूर यांनी दिली.

‘सजेशन फॉर अ‍ॅक्शन’ अन् हेल्पलाईन क्रमांक
चांगले विचार ठेवून आम्ही कार्य करीत राहिलो. चांगल्या विचारांचे फळ चांगलेच येते. त्यातून आम्ही येथपर्यंत पोहोचलो. यापुढेही लोकपयोगी कार्य होत राहण्यासाठी ‘सजेशन फॉर अ‍ॅक्शन’ या सूत्रानुसार आपण काम करूया. आपण दिलेल्या सूचना, सल्ल्यांचे स्वागत आहे, असे आवाहन ना. ठाकूर यांनी केले. मंत्र्यांच्या या संकल्पनेचा धागा पकडून आजपासून हेल्पलाइन सुरू करीत असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.

क्षण न क्षण वेचायचा आहे
अनेक कामे रखडलेली आहेत. आता मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. जराही वेळ व्यर्थ न गमविता लोककल्याणासाठी क्षण न क्षण वेचायचा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

गरिबी दूर व्हायलाच हवी!
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यातील गरिबी दूर व्हायलाच हवी, असे प्रकर्षाने वाटले. त्याच विचारांनी आमचे सरकार कार्यरत आहे. गरिबी आणि श्रीमंती यांच्यातील दरी मिटणार नसेल, तर आम्ही हे सर्व कशासाठी करतोय, हा प्रश्न मनी उद्भवतो, अशा शब्दांत कायद्याच्या पदवीधर असलेल्या यशोमती ठाकूर यांनी समानतेचा विचार अंमलात आणण्याचा मानस व्यक्त केला.

सावित्रीबार्इंची प्रेरणा
सावित्रीबार्इंच्या प्रेरणेने आम्ही येथवर पोहोचल्याचे मी यापूर्वी कुठे तरी बोलून गेली. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील प्रथम आगमनदिनी आज योगायोगाने सावित्रीबार्इंची जयंती आहे, याचा आनंद वाटतो, अशा भावना व्यक्त करून त्यांनी जिल्हाधिकारी सभागृहातील सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.

Web Title: Late is a sensitivity to crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.