शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
3
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
4
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
7
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
8
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
9
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
10
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
11
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
12
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
13
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
14
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
15
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
16
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
17
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
18
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
19
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
20
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा झाडांच्या पानांवर अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 01:23 IST

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाºया वरूड तालुक्यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आता या वैभवाला आणि संत्राउत्पादकांच्या समृद्धीला ओहोटी लागली आहे. प्रथम आंबिया फळाची गळ आणि आता पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे संत्रा झाडांची रया गेली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाला केव्हा येणार जाग? : कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या समस्या संपता संपेना

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंदूरजनाघाट : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाºया वरूड तालुक्यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आता या वैभवाला आणि संत्राउत्पादकांच्या समृद्धीला ओहोटी लागली आहे. प्रथम आंबिया फळाची गळ आणि आता पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे संत्रा झाडांची रया गेली आहे. यावर उपाय सूचविण्याची विनवणी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाला होत आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात लाखो रुपये खर्च करून संत्रा झाडे व संत्रा फळे वाचविण्यासाठी शेंदूरजनाघाट परिसरातील संत्राउत्पादकांना प्रयत्न करावे लागले. ज्याच्याकडे पाणी होते, त्यांच्या संत्राझाडे व संत्राबागावरील फळे वाचली. मात्र, मोठ्या प्रमाणात पाण्याअभावी व अतिशय तापमानाने इतर शेतकºयांची संत्राफळे उन्हाळ्यातच गळली. खरिपाच्या पावसानेही दगा दिला. जूनच्या अखेरपर्यंत ४० अंश सेल्सिअस तापमान होते. भर पावसाच्या कालावधीत तापमान वाढत गेल्याने संत्राझाडे अक्षरश: वठली. पावसाने सुरुवात केली ती संथगतीने. त्यामुळे जमिनीत पाहिजे तसा ओलावा नसल्याने व जमिनीने बाष्प पकडल्याने झाडांची स्थिती दयनीय होती. पुढे पाऊस वाढला; मात्र दमदार नसल्याने जमिनीला पुरेसा ठरला नाही. परिणामी संत्राफळाला गळती लागली. त्यातच फळावरील फडक्या (फळ लटकणे) सुरू झाला. त्यानंतर देठातून संत्रे पिवळी होऊन मोठ्या प्रमाणात गळ सुरू झाली. फळगळीचे प्रमाण मोठे असून, महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही ही गळ आटोक्यात येत नसल्याने संत्रा उत्पादक चिंताग्रस्त झाला आहे.
आता शेंदूरजनाघाट परिसरातील काही भागात पाने खाणाऱ्या अळीने संत्रा झाडांवर हल्ला चढविला आहे. मौजा खेडी परिसरात संत्रा झाडांवर व जमिनीवर प्रचंड प्रमाणात अळ्या दिसून येत आहेत. यामुळे झाडावरील पाने त्या अळ्या खात असून, या पाने खाणाऱ्या अळ्यांचे संत्रा झाडांवर शेंदूरजनाघाट परिसरातील काही भागात जास्त, तर काही भागात कमी असे असले तरी सर्वत्रच फवारणी करून आटोक्यात आणण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
जमिनीची उष्णता पूर्ण निघाली नाही. त्यातच सर्वदूर मुसळधार पाऊस असताना तालुक्यातील बराच भाग पावसापासून वंचित राहिला. केवळ हलक्या व बरड जमिनीतून पाणी जेमतेम राहिले, तर मध्यम व भारी जमिनीतील अजूनही पावसाची कमतरता असल्याने संत्राउत्पादक चिंतातुर झाला आहे. खरिपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्यासोबतच संत्रा झाडांवरील पाने खाणाऱ्या अळ्या वाढतच असल्याने यावर उपाययोजना सुचवण्याकरिता कृषी विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे. संत्रा उत्पादन घेण्याºया शेंदूरजनाघाट, तिवसाघाट, रवाळा, सातनूर, पुसला, मालखेड, वाई, वरूड, धनोडी, मालखेड, जरूड, तिवसाघाट, पुसली, टेंभुरखेडा, हातुर्णा, गव्हाणकुंड परिसरात अंबीया बहाराची गळ सुरू असल्याने नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातून निसटले आहे.

संत्रा झाडावर पाने खाणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढवला. कृषी विभागाने संत्राउत्पादकांना १०० टक्के अनुदानावर फवारणी औषध द्यावे. याकरिता कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी तसे आदेश द्यावेत.
- हर्षल फुटाणे
संत्रा उत्पादक, शेंदूरजनाघाट

संत्रा झाडांवरील फळाची गळ दिवसागणिक वाढतच असुन अळ्यांनीही हल्ला चढवला. कृषी विभागाने त्वरित दखल घेऊ न अनुदानावर फवारणी औषध उत्पादकांना त्वरित उपलब्ध करून द्यावे.
- सतीश अकर्ते
संत्राउत्पादक, शेंदूरजनाघाट

टॅग्स :agricultureशेती