शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती स्थानकाहून धावणार ‘लालपरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे एसटी बसची चाके थांबली होती. चार महिन्यांत कोट्यवधीच्या उत्पन्नावर राज्य परिवहन महामंडळाला पाणी सोडावे लागले. २२ मेपासून जिल्ह्यातील सहा आगारांतून बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र, बडनेरा व अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून बसफेऱ्या बंद होत्या. आता या दोन्ही बसस्थानकांहून ५ ऑगस्टपासून जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.

ठळक मुद्देआजपासून प्रारंभ : चार महिन्यांपासून वाहतूक बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जीवनवाहिनी ‘लालपरी’ अमरावती व बडनेरा बस स्थानकाहून ५ ऑगस्टपासून प्रवासी वाहतूक करणार आहे. कोरोनामुळे चार महिन्यांपासून शहरातून बसफेरी बाहेर गेलेली नाही.लॉकडाऊनमुळे एसटी बसची चाके थांबली होती. चार महिन्यांत कोट्यवधीच्या उत्पन्नावर राज्य परिवहन महामंडळाला पाणी सोडावे लागले. २२ मेपासून जिल्ह्यातील सहा आगारांतून बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र, बडनेरा व अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून बसफेऱ्या बंद होत्या. आता या दोन्ही बसस्थानकांहून ५ ऑगस्टपासून जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या बसफेºया सोडल्या जातील, अशी माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. यासंबंधी परिपत्रकही त्यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना जारी केले. परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतून नजीकच्या तालुक्यांमध्ये २२ मेपासून बस धावत आहेत. त्यानंतर आता अमरावती मध्यवर्ती बसस्थानक व बडनेरा आगारातून बसफेऱ्यांबाबत नियोजन करण्यात आलेए. प्रवाशाचा प्रतिसाद पाहून या बसेस तालुक्यापर्यत सोडल्या जाणार आहेत. याला प्रतिसाद मिळाल्यास बसफेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. याशिवाय एका बसमध्ये केवळ २२ प्रवाशांचीच वाहतूक केली जाणार आहे. याकरिता आवश्यक चालक व तेवढेच वाहक तैनात करण्यात आले आहेत. बसफेऱ्या सुरू होणार असल्याने शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनीसुद्धा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. चार महिन्यानंतर प्रवासी वाहतुकीचे अधिकृत साधन नागरिकांना उपलब्ध झाले. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आसन क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांना प्रवास करावा लागणार असल्याचे विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले.प्रवाशांची ने-आण होती बंदअमरावती व बडनेरा परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने महापालिकेचा हा परिसर ‘रेड झोन’ घोषित करण्यात आला होता. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून दोन्ही आगार व शहरातून एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली होती. आता मात्र या बस स्थानकाहून बस धावणार आहेत.दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण भागातील सहा आगारांमधून बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, अमरावती व बडनेरा आगार व शहरातून बस बंद होत्या. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने कोरानासंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करून दोन्ही आगारांतून बस फेºया सोडल्या जातील.- श्रीकांत गभणेविभाग नियंत्रक

टॅग्स :state transportएसटी