शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्याच्या आठवडी बाजारातून अट्टल गुन्हेगाराचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:11 IST

फोटो - (१) स्थानिक गुन्हे शाखा पथकासोबत आरोपी सचिन भामोरे (लाल टी शर्ट), (२) अचलपूर पोलिसांसोबत आरोपी सागर सोनोने ...

फोटो - (१) स्थानिक गुन्हे शाखा पथकासोबत आरोपी सचिन भामोरे (लाल टी शर्ट), (२) अचलपूर पोलिसांसोबत आरोपी सागर सोनोने (काळे स्वेटर)

परतवाडा : स्थानिक आठवडी बाजारातून अचलपूरच्या एका अट्टल गुन्हेगाराचे अपहरण झाले आहे. जवळपास तीस दिवसांपूर्वी हे अपहरण दोन अपहरणकर्त्यांनी केले. अपहरणकर्ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ज्याचे अपहरण केले गेले, त्याचा शोध अचलपूर व परतवाडा पोलीस घेत आहेत. प्रकरण अतिसंवेदनशील बनले असून, गंभीर वळणावर पोहोचले आहे.

आपण केलेला गुन्हा उघड झाल्याचे बघून दोन अपहरणकर्त्यांपैकी एकाने दगड गिळून, तर दुसऱ्याने हातातील हातकडीने आपल्या कपाळावर मारून घेत स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. स्वत:चे कपाळ फोडून घेणाऱ्या आरोपीवर शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ज्याचे अपहरण झाले तो आणि अपहरणकर्ते असे तिघेही अचलपूरचेच आहेत.

अपहरणाच्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांकडे तक्रार दाखल आहे. पोलिसांनी भादंवि ३६४ अन्वये गुन्हा नोंदविला. यातील एका आरोपीस यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने, तर दुसऱ्या आरोपीस अचलपूर पोलिसांनी दरोडा, लुटमारीच्या घटनेत अटक करून परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

अपहरणापूर्वी दरोडा

अपहरण करण्यापूर्वी या दोन्ही आरोपींनी परतवाडा-बैतुल रोडवरील द्वारका बार व रेस्टॉरन्ट येथे ३ डिसेंबरला मॅनेजरसोबत बिलावरून वाद घातला. चाकूने व्यवस्थापकाच्या मानेवर वार करून लुटमार, मारहाण करीत काऊंटरमधून सहा हजार रुपये जबरीने चोरून नेले होते. त्यांच्याविरुद्ध परतवाडा पोलिसांनी भादंविचे कलम ३९४ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखा पथकाने ७ डिसेंबरला सचिन भामोरे (२३, रा. चावलमंडी, अचलपूर) याला अटक करून परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याचा फरार साथीदार सागर सोनोने (३०) यास देवडी परिसरातून २७ डिसेंबरला अचलपूर पोलिसांनी अटक करुन परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले.

अपहरणकर्त्यांवर गंभीर गुन्हे

अपहरणकर्ते आणि ज्याचे अपहरण झाले, त्यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सागर सोनोने (रा. माळवेशपूरा, अचलपूर) याच्याविरुद्ध अकोला व अमरावती जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, अपहरण व चोरी प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. परतवाड्याच्या आठवडी बाजारातून अचलपूरच्या अट्टल गुन्हेगाराचे अपहरण करण्यामागचा उद्देश आणि ज्याचे अपहरण केले, तो कुठे आणि कुठल्या स्थितीत आहे, याविषयीची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.