हप्तेखोरांचा केळी व्यावसायिकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:16 IST2018-10-21T01:15:35+5:302018-10-21T01:16:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दारू पिण्यासाठी हप्ता मागणाऱ्यांनी केळी व्यावसायिकावर हल्ला चढविल्याची घटना शनिवारी दुपारी नवाथे चौकात घडली. ...

हप्तेखोरांचा केळी व्यावसायिकावर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दारू पिण्यासाठी हप्ता मागणाऱ्यांनी केळी व्यावसायिकावर हल्ला चढविल्याची घटना शनिवारी दुपारी नवाथे चौकात घडली. गुणवंत चावके (४५, रा. नवाथेनगर गल्ली नं. २) असे जखमी केळीविक्रेत्याचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी विक्की गावंडे व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
चावके यांच्या हातगाडीवर शनिवारी दुुपारी विक्कीसह तिघे आले. त्यांनी दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. नकार मिळाल्याने वाद घालून तिघांनी काठीने हल्ला केला. या हल्ल्यात गुणवंत चावके व बिटू हरणे नामक तरुण जखमी झाले. दोन्ही जखमींनी राजापेठ पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. गुणवंत चावके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.