रहिवाशांना न्याय द्या, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:35 IST2017-11-13T22:34:55+5:302017-11-13T22:35:06+5:30
संजय गांधीनगरात ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोरगरीब नागरिकांना वनविभागाने जागा रिकामी करण्यासाठी बजाविलेल्या नाटिसा त्वरित रद्द करून जनतेला न्याय द्यावा,....

रहिवाशांना न्याय द्या, अन्यथा आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संजय गांधीनगरात ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोरगरीब नागरिकांना वनविभागाने जागा रिकामी करण्यासाठी बजाविलेल्या नाटिसा त्वरित रद्द करून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी सोमवारी भाजपा ओबीसी मोर्चा विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
संजय गांधीनगरातील नागरिक सन १९८२ पूर्वीपासून राहत आहेत. विशेष म्हणजे, संजय गांधीनगराला महापालिकेने अधिकृत झोपडपट्टी म्हणून मान्यताही दिली आहे. त्यानुसार या ठिकाणी पक्के रस्ते, नाल्या, समाज मंदिर, उद्यान, वाचनालय अशा सर्वच प्रकारच्या नागरी सुविधा तेथे उपलब्ध केल्या आहेत. याशिवाय शासनाकडून विकासकामेदेखील करण्यात आली आहेत. परंतु अचानकच वनविभागाने येथील नागरिकांना जागा रिकामी करण्याबाबत नोटीस बजावल्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या निवाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत पडले आहे. परिणामी संजय गांधीनगरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने दखल घेऊन न्याय देण्याची मागणी प्रवीण देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपा ओबीसी मोर्चाचे विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.