शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ज्वेलर्स व्यावसायिकाचा मुलगा निघाला हत्यारा

By admin | Updated: November 2, 2014 22:25 IST

धनराज लाईन परिसरातील मंदिराजवळ गुरुवारी रात्री ११ वाजतादरम्यान २२ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला शनिवारी रात्री अटक केली.

अमरावती : धनराज लाईन परिसरातील मंदिराजवळ गुरुवारी रात्री ११ वाजतादरम्यान २२ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला शनिवारी रात्री अटक केली. हा अल्पवयीन आरोपी ज्वेलर्स व्यावसायिकाचा मुलगा असल्याचे सांगण्यात येते. सराफा बाजार परिसरातील धनराज लाईनजवळ गुरुवारी रात्री राजा ऊर्फ सैयद जावेद सैयद हमीद (२२, रा. मोमिनपुरा, बडनेरा) हा युवक गंभीर जखमी अवस्थेत खोलापुरी गेट पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी जखमीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. मृताच्या छातीवर व खाद्यांवर धारदार शस्त्राचे वार केल्याचे आढळून आल्याने याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीवरुन राजा उर्फ सैयद हा गुरुवारी रात्री सक्करसाथ परिसरातील हनुमान मंदिराजवळ निखील नावाच्या मित्रासोबत बसलेला होता. रात्री १०.३० वाजता सुमारास भाजीबाजार परिसरातील रहिवासी अल्पवयीन आरोपीने राजा व निखील यांच्याशी वाद घालून हाणामारी केली होती. यावेळी आरोपीने जवळील चाकू काढून राजा उर्फ सैयदवर हल्ला केला होता. यामध्ये राजा गंभीर जखमी झाला होता. घटना घडताच राजाला जखमी अवस्थेत पाहून त्याचा मित्र निखील याने तेथून पळ काढला होता. या प्रकरणाच्या चौकशीत शुक्रवारी पोलिसांनी निखील याला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत निखीलने सर्व घटनाक्रमाचा खुलासा पोलिसासमोर केला. त्या अनुशंगाने पोलिसांनी शनिवारी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. अल्पवयीन आरोपी हा येथील एका सुवर्णकार व्यवसायिकांचा मुलगा आहे. तसेच लुटमारीच्या अनुशंगाने राजावर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीजवळून हत्येच्या वेळीचे कपडे व चाकू जप्त केला आहे.