दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी! सोने पोहोचले ४९ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 03:32 PM2021-10-14T15:32:03+5:302021-10-14T18:33:43+5:30

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, जीडीपीवर होणारा परिणाम आणि आर्थिक अनिश्चितता हे घटक पुन्हा एकदा सोन्याच्या दरवाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

Jawaibapu's first Dussehra at five thousand, gold reached 49 thousand | दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी! सोने पोहोचले ४९ हजारांवर

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी! सोने पोहोचले ४९ हजारांवर

Next
ठळक मुद्देखरेदीकडे कल : बाजारात रौनक, महिलांची गर्दी, ग्राहकी वाढली

अमरावती : गेल्या दोन महिन्यात सोन्याचा भाव चार हजारांनी वाढला आहे. गुरुवारी सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४९ हजारांवर गेले आहे. चांदी प्रतिकिलो ६२ हजार रुपयांपर्यंत पोहचली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे.

दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून दिले जातात. पण, जावईबापुंचा पहिलाच दसरा असेल, तर सोन्याचे पान देण्याचीदेखील प्रथा आहे. त्यामुळेदेखील सराफा बाजारात ग्राहकी वाढली आहे. मागील वर्षीच्या मार्चपासून उद्भवलेल्या कोरोनामुळे हाताबाहेर गेलेली, सामान्यांसह व्यावसायिकांना हतबल करून सोडणारी स्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्याचा सकारात्मक परिमाण सराफा बाजारावरील ग्राहकीवर झाला आहे.

सोने बाजारात धूम

दोन महिन्यांपासून शहर संपूर्णत: अनलॉक झाले. जनजीवन पूर्वपदावर आले. व्यवसायदेखील पूर्ण जोमाने सुरू झाले आहेत. लागोपाठच्या लॉकडाऊनमुळे अनेकांना सोने खरेदीची हौस पूर्ण झाली नाही. विवाहावेळीदेखील अनेकांना लपून-छपून सोने खरेदी करावे लागले. आता मात्र सराफा बाजार पूर्ण क्षमतेने फुलला आहे. दसरा व दिवाळीच्या शुभपर्वावर सराफा झळाळला आहे.

अर्ध्या ग्रॅमचे पान २५००, तर एक ग्रॅमचे पान पाच हजारात

सराफा बाजारात अध्या ग्रॅमच्या सोन्याच्या पानासाठी २५०० रुपये, तर एक ग्रॅमच्या सोन्याच्या पानासाठी सुमारे ४८०० ते ५ हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. मात्र, हौसेला व मानपानाला मोल नसल्याने या सुवर्णपानांची खरेदीदेखील जोरात सुरू आहे.

महिनाभरात ३००० रुपयांची वाढ

१) सप्टेंबर २०२१ मध्ये २४ कॅरेट सोन्याचे भाव ४६००० ते ४६५०० प्रति १० ग्रॅम असे होते.

२) आता विजयादशमीच्या पर्वावर २४ कॅरेट सोन्याचे दर ४८ हजारांच्या घरात पोहोचले आहे.

३) २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७ हजार रुपये असा आहे.

Web Title: Jawaibapu's first Dussehra at five thousand, gold reached 49 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.