जवाहर सूत गिरणीचे संस्थापक नरेंद्र देशमुख यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 21:08 IST2019-02-13T21:05:30+5:302019-02-13T21:08:21+5:30

अमरावती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हरिभाऊ मोहोड यांचे ते जावई होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, चार बहिणी व मोठा आप्तपरिवार आहे.

Jawahar Yatra founder Narendra Deshmukh dies | जवाहर सूत गिरणीचे संस्थापक नरेंद्र देशमुख यांचे निधन

जवाहर सूत गिरणीचे संस्थापक नरेंद्र देशमुख यांचे निधन

अमरावती : धामणगाव येथील रहिवासी व जवाहर सूत गिरणीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र श्यामराव देशमुख यांचे बुधवारी पहाटे अमरावती येथील रेडिएंट हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. 

अमरावती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हरिभाऊ मोहोड यांचे ते जावई होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, चार बहिणी व मोठा आप्तपरिवार आहे. नरेंद्र यांच्या पार्थिवावर धामणगाव येथे बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सूत गिरणीचे विद्यमान अध्यक्ष सागर मेघे, उपाध्यक्ष विजय उगले, संचालक तसेच जिल्ह्यातील काँग्र्रेस, युवक काँग्रेस व सहकार क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. 
 

Web Title: Jawahar Yatra founder Narendra Deshmukh dies