शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

स्थायीत गाजला दांडीबहाद्दरांचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 6:00 AM

स्थायी समिती सभेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रशासनप्रमुखांना या मुद्द्यावर जाब विचारला. यावर सीईओ अमोल येडगे यांनी यापुढे कुठलेही खातेप्रमुख वा बीडीओंनी विनापरवानगी सभेला अनुपस्थित राहू नये, असे बजावत प्रशासकीय कारवाईची ताकीद दिली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे कुंपण विनापरवानगी काढल्याचा मुद्दा सुहासिनी ढेपे यांनी मांडला.

ठळक मुद्देअध्यक्षांनी सुनावले : सीईओंकडून कारवाईची ताकीद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत स्थायीच्या सभेला विनापरवानगी गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांचा मुद्दा गुरुवारी गाजला. विविध सभा, बैठकांना अनेक अधिकारी हे अध्यक्ष व सीईओंना न सांगताच गैरहजर राहतात. परिणामी पदाधिकाऱ्यांना पुढील सभेपर्यंत उत्तराची प्रतीक्षा करावी लागते. अशा अधिकाºयांना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तंबी दिली.स्थायी समिती सभेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रशासनप्रमुखांना या मुद्द्यावर जाब विचारला. यावर सीईओ अमोल येडगे यांनी यापुढे कुठलेही खातेप्रमुख वा बीडीओंनी विनापरवानगी सभेला अनुपस्थित राहू नये, असे बजावत प्रशासकीय कारवाईची ताकीद दिली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे कुंपण विनापरवानगी काढल्याचा मुद्दा सुहासिनी ढेपे यांनी मांडला. यावर दोषीविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेश बीडीओंना देण्यात आले. याशिवाय येणस येथील सिमेंट रस्त्याच्या लोकेशनचा मुद्दाही गाजला. यातील दोषींवर कारवाईचे आश्वासन सीईओंनी दिलेत. सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, प्रियंका दगडकर, पूजा आमले, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य महेंद्रसिंह गैलवार, अभिजित बोके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

शाळांच्या थकीत देयकांचा मुद्दा गाजलाजिल्हा परिषदेच्या जिल्हाभरातील अनेक शाळांमध्ये वीज देयकांची रक्कम थकीत असल्याने बहुतांश शाळांमध्ये वीजपुरवठा खंडित आहे. हा मुद्दा सदस्य सुनील डिके यांनी मांडला. यावर संबंधित ग्रामपंचायतींना शाळेच्या थकीत वीज देयके भरण्याबाबत पुन्हा आदेश देण्याचे आश्वासन सीईओ अमोल येडगे यांनी दिले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद