पार्डी येथे किरकोळ वादातून भाला खुपसून इसमाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 22:58 IST2023-09-24T22:58:29+5:302023-09-24T22:58:36+5:30

केले दहा ते बारा वार, आरोपीची मोर्शी पोलिसात शरणागती

Isma was killed by a javelin over a petty dispute at Pardi | पार्डी येथे किरकोळ वादातून भाला खुपसून इसमाची हत्या

पार्डी येथे किरकोळ वादातून भाला खुपसून इसमाची हत्या

मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील पार्डी येथील पिंपळखुटा मोठा मार्गावर पाण्याच्या टाकी जवळ किरकोळ वादातून लाकडीच्या काठीने मारहाण तसेच भाल्याने दहा ते बारा वेळा भोसकून नामदेव भिवकुंडे नामक इसमाची निर्घृण हत्या करण्यात आली.

रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. पोलीस सूत्रांनुसार, साठीच्या पुढे असलेल्या नामदेव भिवकुंडे यांचा मित्र फगु युवनाते याने घरी जेवणाकरिता मटण घेऊन आले होते. दोघांनी फगुच्या घरी जेवणाआधी मद्यपान केले होते. यानंतर त्यांचा वाद रंगला. यातूनच नामदेव यांनी मला घरी सोडून दे, तू माझा दोस्त नाही, असे फर्मावले. काही बाबी जिव्हारी लागलेल्या फगुने नामदेव भिवकुंडे यांना भाल्याने भोसकलेक्रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या नामदेवचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मोर्शी ठाणे गाठून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.

मोर्शी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि रक्ताच्या थोराळ्यात पडलेल्या नामदेवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पुढील तपास ठाणेदार श्रीराम लांबाडे यांच्या मार्गदर्शनात होत आहे.

Web Title: Isma was killed by a javelin over a petty dispute at Pardi