शहरं
Join us  
Trending Stories
1
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
2
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
3
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
4
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
5
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
6
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
7
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
8
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
9
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
10
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
11
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
12
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
13
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
15
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
16
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
17
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
18
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
19
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
20
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
Daily Top 2Weekly Top 5

’इर्विनच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीला ‘स्वाईन फ्लू’

By admin | Updated: April 13, 2017 00:06 IST

‘स्वाईन फ्लू’ संशयित मातेजवळ स्तनपानासाठी आणल्या जाणाऱ्या अवघ्या २३ दिवसांच्या चिमुरडीला ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झाली आहे.

वॉर्ड क्र.९ मधील प्रकार : संशयित मातेकडून वारंवार स्तनपानअमरावती : ‘स्वाईन फ्लू’ संशयित मातेजवळ स्तनपानासाठी आणल्या जाणाऱ्या अवघ्या २३ दिवसांच्या चिमुरडीला ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झाली आहे. तिचे ‘स्वॅब’ पॉझिटीव्ह आले असून झाल्या प्रकारासाठी इर्विन रूग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचा सूर उमटत आहे. सिद्धार्थनगरातील २४ वर्षीय महिलेला ‘स्वाईन फ्लू’ संशयित म्हणूून जिल्हा सामान्य रूग्णालयातील वॉर्ड क्र.९ मध्ये दाखल करण्यात आले आहे. या महिलेच्या अवघ्या २३ दिवसांच्या चिमुकलीलाही सर्दी-खोकल्याची बाधा झाल्याने तिच्यावर सुद्धा याच रूग्णालयात वॉर्ड क्र. ५ मध्ये उपचार सुरू आहेत. मायलेकी एकाच रूग्णालयात असल्याने चिमुरडीला तिचे नातलग वारंवार स्तनपानासाठी मातेजवळ आणत होते. यातूनच तिला स्वाईन फ्लूच्या विषाणुंचा संसर्ग झाला आहे. रूग्णालय प्रशासनाने असे न करण्याबाबत नातलगांना व रूग्ण महिलेला बजावल्यानंतरही त्यांनी हा प्रकार सुरूच ठेवल्याचे रूग्णालय प्रशासनाचे म्हणणे असले तरी रूग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि हलगर्जीपणामुळेच २३ दिवसांच्या चिमुरडीला या भयंकर रोगाची बाधा झाली आहे.प्रतिबंधात्मक उपाय हाच पर्यायअमरावती : शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रसार झपाट्याने होतोय. या रोगामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. ‘स्वाईन फ्लू’ च्या रूग्णांसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात ९ क्रमाकांचा विशेष वॉर्ड असून या रुग्णांवर तेथे उपचार केले जातात. या वॉर्डात आतापर्यंत १७ संशयितांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले आहेत. पैकी चौघांचे ‘स्वॅब’ पॉझिटीव्ह आले आहेत. हा संसर्गजन्य आजार हवेच्या माध्यमातून झपाट्याने पसरत असल्यामुळे यावर प्रतिबंधात्मक उपाय हाच एकमेव पर्याय आहे. सद्यस्थितीत या वॉर्डात दोन पॉझिटीव्ह रूग्णांवर उपचार सुरु असून आता त्यात २३ दिवसांच्या या चिमुकलीचीही भर पडली आहे. तिला वॉर्ड क्रमांक ९ मधील विषाणुंमुळेच ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झाली आहे. आई आणि चिमुरडी एकाच रूग्णालयात दाखल असल्याने आपल्या नवजात बाळाविषयी मातेला ओढ वाटणे स्वाभाविक होते. तिच्या आग्रहास्तव नातलग वॉर्ड क्र. ५ मधून चिमुरडीला स्तनपानासाठी वॉर्ड क्र. ९ मध्ये आणत असत. वॉर्ड क्र. ९ या स्वाईन फ्लू बाधितांच्या कक्षात एका पॉझिटीव्ह महिलेसह अन्य संशयित रूग्ण देखील दाखल असल्याने हवेतील संसर्गातून चिमुरडीला स्वाईन फ्लूची बाधा झाली. सद्यस्थितीत चिमुरडीच्या आईचा ‘स्वॅब’ अहवाल निगेटिव्ह असला तरी बिचाऱ्या निष्पाप चिमुरडीचा ‘स्वॅब’मात्र पॉझिटीव्ह आला आहे. नातलगांनी रूग्णालय प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने हा गंभीर प्रकार घडला आहे. परिचारिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष स्वाईन फ्लूच्या वॉर्डात बाळाला आणू नका, अशा सूचना परिचारिकांनी अनेकदा नातेवाईकांना दिल्याचे येथील परिचारिकांनी सांगितले. नातलग ऐकत नसल्याने मायलेकंीना या वॉर्डातील एका विशेष खोलीत ठेवण्यात आले होते, हे विशेष.रूग्णालय प्रशासन कठोर का नाही?‘स्वाईन फ्लू’ हा गंभीर आजार आहे. याबाबत काळजी घेण्याची जबाबदारी सर्वस्वी ‘इर्विन’ची आहे. रूग्णांना रोगाचे गांभीर्य कळत नसले तरी रूग्णांना संभाव्य परिणामांबद्दल माहिती देण्याची जबाबदारी रूग्णालयाचीच आहे.