शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ केंद्रांवर वाढतोय राजकीय कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप

By admin | Updated: May 4, 2015 00:25 IST

शहरातील बहुतांश आधारकार्ड केंद्रांवर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. कार्यकर्त्यांच्या जवळच्या ...

नागरिक वैतागले : सहा अधिकृत सेतू केंद्रांवर येताहेत कटू अनुभव वैभव बाबरेकर अमरावतीशहरातील बहुतांश आधारकार्ड केंद्रांवर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. कार्यकर्त्यांच्या जवळच्या लोकांनाच प्राधान्य दिले जात असल्यामुळे सामान्य नागरिकांची मात्र, हेळसांड होत आहे. सद्यस्थितीत शहरात सहा सेतू कार्यालयांमध्ये आधार नोंदणी अधिकृतरीत्या सुरू आहे. परंतु या केंद्रांवर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढल्याने नागरिकांना एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्राकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरिकांना त्यांचे नागरिकत्व सिध्द करता यावे, या उद्देशाने केंद्र शासनाने आधारकार्डची संकल्पना मांडल्यानंतर देशभरात युध्दस्तरावर आधार नोंदणी सुरु झाली. कोणत्याही आधार केंद्रावर जाऊन नागरिक आधार नोंदणी करु शकतात, अशी सोय शासनाने उपलब्ध करून दिली. नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील विविध भागांत आधार केंद्रे उघडण्यात आली आहेत. सद्यस्थितीत शहरात २२ सेतू केंद्र कार्यरत असून तेथे विविध प्रकारची कामे केली जातात. यापैकी ६ सेतू केंद्रांवर आधार नोंदणी प्रक्रिया सुरु ठेवण्यात आली आहे. हमालपुरा, राझिलनगर, चिलम छावणी, शेगाव नाका, बडनेरा व बियाणी चौक अशा सहा सेतुंवर आधार नोंदणी सुरु आहे. ज्यांची आधार नोंदणी झालेली नाही असे नागरिक शहरातील विविध सेतुंवर जाऊन आधार नोंदणी करीत आहेत.वाढदिवसानिमित्त आधार नोंदणी शिबिरशासनाने शहरातील सहा सेतू केंद्रांवर अधिकृत आधार केंद्र दिली आहेत. मात्र, सुजाण नागरिक खासगी कार्यक्रमानिमित्तही आधार नोंदणी शिबिरे घेत आहेत. राजकमल चौकात एका व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त आधार नोंदणी शिबिर घेण्याबाबतचे फलक लावल्याचे आढळले होते. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हे शिबिर बंद करण्याचे आदेश दिले होते. सेतू केंद्रांमध्ये राजकीय कार्यकर्त्यांचा वाढता हस्तक्षेप ही चुकीची बाब आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी टोकन प्रणाली सुरु करण्यात आली आहे. त्याबद्दल सेतूच्या अधीक्षकाला सूचना देण्यात आल्या आहेत. नमुन्यातील कॅम्पबद्दल तक्रारी आल्या असून तो कॅम्प आता संपला आहे. - सैयद सईद कादरी,जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, (ई-प्रशासन)