शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

आंतरराष्ट्रीय सट्ट्याचा सोयाबीनला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:01 IST

सोयाबीनचे दर कमी होण्यामागे हलक्या प्रतवारीचा तर्क लावला जात असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याचाही फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे.

ठळक मुद्दे‘एनसीडीईएक्स’चा परिणाम : डीओसीची निर्यात मंदावली, दिवसातून चार वेळा दरात चढ-उतार

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोयाबीनचे दर कमी होण्यामागे हलक्या प्रतवारीचा तर्क लावला जात असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याचाही फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. सोयाबीनचा समावेश असणारे एनसीडीईएक्स (नॅशनल कमोडिटी डेरिव्हेशन एक्सचेंज लिमिटेड) मध्ये दिवसभरात चार वेळा दर कमी-जास्त होत असल्यानेच सोयाबीन उत्पादकांची खुलेआम लूट सुरू आहे.व्यापाºयांच्या परिभाषेत ‘डब्बा’ अशी ओळख असलेल्या एनसीडीईएक्सचा दिवसाचा पहिला दर सकाळी ११.३० दरम्यान जाहीर झाल्यानंतरच व्यापाºयांकडून स्थानिक बाजारात सोयाबीनची खरेदी सुरू होते. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे अमेरिकेत सोयाबीनचे उत्पादन घटले तरी ब्राझील, अर्जेन्टिना आदी सोयाबीन उत्पादक असलेल्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. त्यामुळे भारताचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या चीनकडून सोयाबीनच्या ‘डीओसी’ची मागणी मंदावली. त्यातच महाराष्ट्रात सोंगणी व मळणीच्या काळात अवकाळी पावसामुळे सोयाबीनची प्रतवारी घसरून सरासरी उत्पादन कमी झाले. त्यामुळे सोयाबीन केकची मागणीदेखील मंदावली आहे. याचा थेट परिणाम निर्यातीवर झाला व सोयाबीनचे दर आधारभूत किमतीपेक्षाही कोसळले असल्याची माहिती व्यापारी सुत्रांनी दिली.मागील वर्षी अति पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीनचे नुकसान झाले, तर यंदा पेरणीपासून अत्यल्प पाऊस व काढणीच्या हंगामात अवकाळीचा कहर यामुळे सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. यंदाच्या हंगामात व्यापाºयांनी चक्क दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची खरेदी केली. शासनाने नाफेडद्वारा खरेदी सुरू केली असली तरी ‘एफएक्यू’ ग्रेड असल्यामुळे शेतकºयांना माघारी पाठविण्यात येते व नाइलाजास्तव शेतकºयांना व्यापाºयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.प्रतवारीमुळे ‘डीओसी’ची निर्यात मंदावलीमागील दोन वर्षांचा आढावा घेता, सोयाबीन ‘डीओसी’ (पावडर) चे दर साधारणपणे ४५०० ते ४७०० रुपये प्रतिक्विंटल होते.यंदा मात्र ते २६०० ते २८०० रुपये असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. डीओसीचा वापर पशुखाद्य व बिस्कीट निर्मितीत होतो. भारतात प्रामुख्याने कोंबडी खाद्य म्हणून या पावडरचा वापर होतो. आंतरराष्ट्रीय दर घसरल्यानेच ‘डीओसी’ची निर्र्यात मंदावली आहे.काय आहे व्यापाºयांचा ‘डब्बा’?सोयाबीनचा समावेश एनसीडीईएक्समध्ये असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारभावातील चढ-उतारांचा देशांतर्गत भावावर थेट परिणाम होतो. साधारणपणे सकाळी ११.३० च्या सुमारास पहिला आंतरराष्ट्रीय दर जाहीर झाल्यानंतरच स्थानिक व्यापारी त्या अनुषंगाने खरेदी करतात. याला व्यापाºयांच्या सांकेतिक भाषेत ‘डब्बा’असे संबोधण्यात येते. जोवर या डब्ब्याचे दर जाहीर होत नाही, तोवर स्थानिक बाजारात व्यापारी खरेदी करीत नसल्याचे वास्तव आहे.इंदूर सेंटरवर २७५० ते २७८० रुपये पोहोचअडते व व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात एनसीडीएक्सचे केंद्र असणाºया इंदूरला शुक्रवारी २,७५० ते २,७८० रुपये प्रतिक्विंटल पोहोच असा दर होता. हा दर आधारभूत किमतीपेक्षा ३०० रुपयांनी जागेवरच कमी आहे. त्यामुळे व्यापारी भाव पाडून दोन हजार रुपयांपासून सुरुवात करतात. यंदाच्या सोयाबीनची प्रतवारीदेखील कमी असल्याने सोयाबीन प्लांटवरच कमी-अधिक भावात विकले जात असल्याचे वास्तव या सूत्रांनी सांगितले.यंदा उत्पादन कमी असतानाही डीओसीचे भाव पडले. कमोडिटी मार्केटचाही फटका आहे. हमी भावात उत्पादनखर्च निघणे शक्य नसल्याचे कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्षांना पटवून दिले.- विजय जावंधिया, शेतकरी नेतेकमोडिटी मार्केटसह कुक्कुटपालकांच्या लॉबीने भाव पाडले. पामतेलाच्या आयातीचा परिणाम झाला आहे. त्यातच पावसामुळे प्रतवारी कमी होऊन उत्पादनही कमी झाले.- किशोर तिवारी, अध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशनयंदा अवकाळीने सोयाबीनची प्रतवारी घसरली. डीओसीलाही भाव नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाली आहे. एनसीडीईएक्सचा सोयाबीनच्या दरावर कोणताही फरक पडला नाही.- अमर बांबल, अडते-व्यापारी