शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

बोगस सरकारी नोकरीचे रॅकेट उघडकीस, दिल्लीतला मृत व्यक्तीही पोलिसांनी शोधला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 22:18 IST

दिल्लीतील मुख्य आरोपीला काढले हुडकून, गाडगेनगर पोलिसांची कामगिरी 

अमरावती : सरकारी नोकरीचे आमिष देऊन बेरोजगारांकडून मोठी रक्कम लाटणाऱ्या आठ जणांच्या टोळक्याला गाडगेनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातील मुख्य आरोपी असलेली दिल्लीतील व्यक्ती मेल्याचे पसरविण्यात आले होते. तथापि, १२ दिवस लागोपाठ तांत्रिक शोध घेऊन त्याला हुडकून काढण्यात आले. या टोळक्यात अमरावती, बडनेरा शहरातील प्रत्येकी एकाचा आणि मोर्शी शहरातील दोघांचा समावेश आहे. 

पोलीस सूत्रांनुसार, चांदूर बाजार तालुक्यातील हिरूरपूर्णा येथील  विलास एकनाथराव भुस्कडे (५०) यांची मुलगी साक्षी हिला आरोग्य सेवा संचालनालय, आयकर विभाग, उत्तर रेल्वे, प्रधान मुख्य आयकर आयुक्त यांच्या कार्यालयाचे अस्सल भासणारे पत्र देऊन नोकरीच्या आमिषाखाली १५ लाखांनी फसवणूक करण्यात आली. याबाबत भुस्कडे यांनी आशुतोष अनिल तायडे (प्रवीणनगर, अमरावती) अनिल तायडे, त्याची मुलगी, दिल्ली व मुंबई येथील इन्कम टॅक्स व जीएसटी कार्यालयात भेटलेली व्यक्ती व यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात मुलाखत घेणारी अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. 

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त परिमंडळ-१ सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले, यांनी कोरोनाकाळात झालेल्या या फसवणूक प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्याचे आदेश सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद साळोखे यांच्या नेतृत्वातील तपास पथकाला दिले होते. पथकाने दोन महिन्याच्या तपासात अमरावती, यवतमाळ, मुंबई, सातारा, दिल्ली येथून एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली. तथापि, मुख्य आरोपी असलेला दिल्ली येथील अनिल उदय गौतम ऊर्फ माथूर (३८, रा. वाणी विहार, उत्तमनगर, दिल्ली) हा मरण पावल्याची वदंता पसरविण्यात आली होती. तथापि, १२ दिवस सलग तांंत्रिक तपास करून त्याला अटक करण्यात आली. 

आशुतोष अनिल तायडे (२६, रा. प्रवीणनगर, अमरावती), अनिरुद्ध ऊर्फ चंदन भागवतराव राऊत (३३, रा. मोर्शी), चंद्रशेखर ऊर्फ विशाल धनराज बडोदेकर (३६, रा. मोर्शी), दादाराव जंगलू इंगळे (६९, रा. बडनेरा), राजेंद्र नामदेव पोटेकर (४२, रा. सातारा), विकास कुमार अशोक कुमार (३९, रा. दिल्ली), सुनील यशवंत कदम (३९, रा. मुंबई) अनिल उदय गौतम ऊर्फ माथूर (३८, रा. वाणी विहार, उत्तमनगर, दिल्ली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी सात जण न्यायालयीन कोठडीत तर मुख्य आरोपी अनिल उदय गौतम उर्फ माथुर हा पोलीस कोठडीत आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले. त्याच्याकडून आणखी किती नागरिकांना सरकारी नोकरी लावण्याचा नावाने फसविण्यात आले, याचा तपास होत आहे. आरोपींकडून पोलिसांनी रोख ७० हजार रुपये, सोन्याचे १२ लाख ४० हजार ९६६ रुपयांचे दागिने, ७०६ ग्रॅम चांदीचे दागिने, शोभेचे १५ हजार ४०० रुपयांचे दागिने, लॅपटॉप, प्रिंटर असा १३ लाख २२ हजार २५६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद साळोखे, उपनिरीक्षक गिरी, राजेंद्र जठाळे, नंदकुमार इंगळे, अमोल यादव, गोरख पिंगळे, राहुल टवलारकर, मनीराम पेठकर, ओम सावरकर, सिद्धार्थ शृंगारपुरे यांच्या पथकाला तांत्रिक मदत सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे, पोलिस अंमलदार पंकज गाडे यांच्यात पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjobनोकरी