शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

साथ नियंत्रणासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST

अमरावती : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला आलेल्या अडचणी, नव्याने उभाराव्या लागलेल्या बाबी आदींचा अभ्यास करून यापुढे साथींच्या नियंत्रणासाठी ...

अमरावती : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला आलेल्या अडचणी, नव्याने उभाराव्या लागलेल्या बाबी आदींचा अभ्यास करून यापुढे साथींच्या नियंत्रणासाठी सुसज्ज कायमस्वरूपी यंत्रणा उभी राहण्याच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी दिले आहेत.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल, सीईओ अमोल येडगे, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, आयएमएचे अध्यक्ष अनिल रोहणकर आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील साथीची तीव्रता, त्यापासून होणारी हानी रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. चाचणी, उपचार, मार्गदर्शन, लोकशिक्षणाबाबत कायमस्वरूपी यंत्रणा सर्वत्र उभारावी. यात ग्रामीण आरोग्य यंत्रणाही बळकट व्हावी. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांत अद्ययावत सुविधा उभाराव्यात. चाचणी प्रयोगशाळांचेही अद्ययावतीकरण करावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी तपासण्यांची संख्या वाढवावी. त्याचप्रमाणे, लसीकरणाचा विस्तारही होणे आवश्यक आहे. व्यक्तीला आपल्या चाचणीचे निष्कर्ष वेळेत कळावेत, यासाठी एसएमएस सुविधा सुरू केली आहे. मात्र, ती खंडित होता कामा नये. लसीकरणाबाबत नोंदणी केलेल्या व्यक्तींना जाणाऱ्या संदेशातही अचुकता व स्पष्टता नसल्याबाबत तक्रारी आल्या आहेत, असे होता कामा नये. संपर्क यंत्रणा सुरळीत, सुस्पष्ट, जलद व अचूक असावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी शुक्रवारी दिले.

बॉक्स

उपचारानंतरही दक्षता महत्त्वाची

कोरोनाबाधितांना उपचारानंतराअंती घरी सोडण्यात येते. मात्र, उपचारानंतरही काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. त्यामुळे त्यांच्या दक्षता, समुपदेशनासाठी यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे, याबाबत बरे झालेल्या रुग्णांनी घ्यावयाची काळजी, फिजिओथेरपी, मेडिटेशन याबाबत स्वतंत्र सुविधा दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.