शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एसपींची कल्पकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 5:00 AM

जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी सामाजिक जाणिवेतून ९ व १० जुलै रोजी काटकुंभ, गांगरखेडा, चुरणी, जारिदा, बारूगव्हाण, बिबा, कारंजखेडा, हतरू, बिच्छुखेडा, माखला, माडीझडप या दुर्गम भागात प्रत्यक्षात भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला. अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत त्यांना मार्गदर्शन केले. बॅनर व पत्रकांद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देमेळघाटात ट्रॅकिंग मोहीम, हरिबालाजी एन. यांचा आदिवासी बांधवांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/चुरणी/चिखलदरा : मेळघाटातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जिल्हा पोलीस दलाने ट्रेकिंग मोहीम हाती घेतली आहे. सिपना वन्यजीव विभागाच्या सहकार्याने जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. व उपवनसंरक्षक शिवाबाला एस. यांनी शुक्रवारी काटकुंभ व चुरणी येथून या मोहिमेला सुरुवात केली.जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी सामाजिक जाणिवेतून ९ व १० जुलै रोजी काटकुंभ, गांगरखेडा, चुरणी, जारिदा, बारूगव्हाण, बिबा, कारंजखेडा, हतरू, बिच्छुखेडा, माखला, माडीझडप या दुर्गम भागात प्रत्यक्षात भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला. अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत त्यांना मार्गदर्शन केले. बॅनर व पत्रकांद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची माहिती देण्यात आली. अघोरी प्रथांमुळे गुन्हे दाखल होऊ शकतात. हे लक्षात घेऊन मेळघाटातील अघोरी व चुकीच्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत. त्यासाठी प्रबोधन करणारे व्हिडीओ तयार करून ते मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले. त्यांच्यासह व सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक शिवाबाला एस. हे बिच्छुखेडा, हतरू, जारिदा, बोरदा, बारुगव्हाण या भागात जाऊन दोन दिवस अंधश्रद्धेबाबत जागर करणार आहेत.काटकुंभ व चुरणी येथील मोहिमेवेळी चिखलदऱ्याचे ठाणेदार आकाश शिंदे, वनाधिकारी के.एस. पाटील, सहायक उपनिरीक्षक सुरेश लाखोडे, पोलीस कॉन्स्टेबल आशिष वरघट, रूपेश शिंगणे व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या ट्रेकिंग मोहिमेत पोलीस अधीक्षक ३५ किलोमीटर पायी चालले, तर १६० किमी प्रवास वाहनांद्वारे केला.समूळ उच्चाटन गरजेचेमेळघाटात आजही ‘दम्मा’सारखी पद्धत अंगीकारून लहानग्यांना गरम सळईचे चटके दिले जातात. असे भगत, भूमका आदिवासींमध्ये दहशत, भीती निर्माण करतात. डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देण्याऐवजी त्यांची फसवणूक करतात. या प्रथेचे समूळ उच्चाटन गरजेचे असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले.चिखलदरा पोलीस ठाण्यात जून महिन्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. अंधश्रद्धेचा पगडा असणाºया मेळघाटातील अघोरी प्रथा बंद झाल्या पाहिजे, या जाणिवेतून दोन दिवस ट्रेकिंग मोहीम घेतली आहे.- हरिबालाजी एन.जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Policeपोलिस