लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेती व घरगुती कामासाठी मोठ्या प्रमाणात भूजल साठ्याचा उपयोग केला जात असल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी घटत चालली आहे. जिल्ह्यात मागील तीन वर्षात सरासरीपेक्षा जास्त पडला आहे. परिणामी जिल्ह्याच्या पाणी पातळीत ०.८० मीटरने वाढ झाली आहे. एकीकडे सकारात्मक चित्र असले तरी दुसरीकडे मात्र जिल्ह्यात ड्रायझोन क्षेत्र वाढत चालले आहे. यामुळे भविष्याच्या दृष्टिकोनातून ड्रायझोन क्षेत्र असलेल्या पट्ट्यात प्राधान्याने भूजलाचे पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
याशिवाय जलयुक्त शिवारसारख्या योजनामधून पाणी पातळी खोलवर गेलेल्या ठिकाणी जलसंधारणाची कामे, तसेच धरणातील गाळ काढणे, नवीन बंधारे बांधणे यासारखी कामे केल्यास याचा बराच फायदा भूजल वाढीसाठी होऊ शकतो. यासाठी लोकसहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. मागील काही महिन्यातील जिल्ह्यातील भूजलाची स्थिती लक्षात घेता चिखलदरा, चांदुर रेल्वे, धामणगांव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी या पाच तालुक्यातील पाणीपातळी कमी आहे. तर भातकुली तालुक्याची पाणी पातळी स्थिर आहे. अमरावती, अचलपूर, चांदुर बाजार, अंजगाव सुर्जी, दर्यापूर, वरुड या तालुक्यात पाणीपातळीत वाढ झाल्याची गत ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे जिल्ह्यात मागील तीन वर्षात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने जिल्ह्याच्या पाणी पातळीत ०.९० मिटरने वाढ झाली आहे.
पाच तालुक्यातील भूजल पातळी सर्वात खोलकाही वर्षात ड्रायझोनचे क्षेत्र वाढल्याने पाणी पातळी खोल गेल्याचा निष्कर्ष जीएचडीएने काढला आहे. यामध्ये चांदुर रेल्वे, चिखलदरा, धामणगांव, मोर्शी, नांदगाव या तालुक्यांचा समावेश आहे.
चार तालुक्यांची पाणी पातळी सर्वांत चांगलीजिल्ह्यात मागील तीन वर्षांत सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, अमरावती या तालुक्यांतील पाणी पातळी बऱ्यापैकी वाढली आहे.
जलसंधारणावर भर देण्याची गरजमागील तीन वर्षात जिल्ह्यात पाणी पातळीत ०.८० मीटरने वाढ झाली असली तरी १४ पैकी पाच तालुक्यातील पाणी पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याचा उपसा अधिक होत आहे. त्यामुळे ड्रायझोन क्षेत्रासह अन्य तालुक्यात जलसंधारणावर भर देण्यासाठी लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे. पाणी पातळीत वाढ करण्यासाठी पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या तर निश्चित पाणीपातळीत वाढ होऊ शकते.
विहीर, बोअरसाठी परवानगी कुठे घ्याल?महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ नुसार एसडीओंना प्राधिकृत केले आहे. सार्वजनिक पिण्याच्या व्यवस्थेसाठी विहीर, बोअरसाठी एसडीओकडे प्रस्ताव देऊन याला मंजुरी दिली जाते.
कुठल्या तालुक्याची पाणीपातळी किती ?तालुका पाणीपातळीअचलपूर ३.५१अमरावती ०.१६अंजनगाव सुर्जी १.०२भातकुली ०.५९चांदुर रेल्वे ०.२४चांदुर बाजार ४.२३चिखलदरा ०,०१दर्यापूर १.०८धामणगांव रेल्वे ०.१७धारणी ०.०५मोर्शी ०.२३नांदगाव खंडेश्वर ०.११तिवसा ०.२१वरूड १.०६