पत्नीची हत्या करून फासावर लटकवले; अमरावती येथील घटना, पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 20:36 IST2017-10-16T20:35:37+5:302017-10-16T20:36:26+5:30
क्षुल्लक कारणावरून पत्नीशी वाद घालून गळा दाबून हत्या केल्यानंतर आत्महत्या वाटावी, यासाठी फासावर लटकविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

पत्नीची हत्या करून फासावर लटकवले; अमरावती येथील घटना, पतीला अटक
धामणगाव रेल्वे (अमरावती) : क्षुल्लक कारणावरून पत्नीशी वाद घालून गळा दाबून हत्या केल्यानंतर आत्महत्या वाटावी, यासाठी फासावर लटकविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शवविच्छेदनात गळा बादल्याचा अहवाल आल्यामुळे दत्तापूर पोलिसांनी याप्रकरणी पतीस अटक केली आहे.
ममता रमेश सेलोकर (३२, रा.कृष्णनगर) असे मृत पत्नीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री रमेश व ममता या पती-पत्नीत वाद झाला. वाद विकोपाला पोहोचल्याने संतापच्या भरात रमेशने ममताचा गळा दाबला. बराच वेळ गळा दाबून धरल्यामुळे ममताचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच रमेशने फासावर लटकवून आत्महत्या वाटावी, असा भास निर्माण केला. त्यानंतर त्यानेच ही गोष्ट आसपासच्या नागरिकांना व दत्तापूर पोलिसांना सांगितली. पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. ममताची हत्या गळफासाने नव्हे, तर गळा दाबून झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी रमेश सेलोकार यास अटक करून गुन्हे नोंदविले आहे. या प्रकरणाचा तपास दत्तापूरचे ठाणेदार प्रतीक पोयाम करीत आहेत.