अमरावतीत पोटच्या गोळ्यानेच बापाचा घेतला बळी; दारूच्या नशेत वडिलांची हत्या    

By प्रदीप भाकरे | Updated: March 13, 2026 12:27 IST2026-03-13T12:26:57+5:302026-03-13T12:27:39+5:30

Amravati Crime News : अमरावती येथील गोपाळ नगरमध्ये मद्यधुंद मुलाने वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. लाकडी बल्लीने डोक्यावर वार केल्याने पित्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

In Amravati, a father was killed by a Drunk son | अमरावतीत पोटच्या गोळ्यानेच बापाचा घेतला बळी; दारूच्या नशेत वडिलांची हत्या    

अमरावतीत पोटच्या गोळ्यानेच बापाचा घेतला बळी; दारूच्या नशेत वडिलांची हत्या    

- प्रदीप भाकरे 
अमरावती: स्थानिक गोपाळ नगर येथील मत्स्यगंधा कॉलनी परिसरात एका मद्यधुंद मुलाने स्वतःच्या वडिलांची बल्लीने प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मनोहर मधुकर बोरकर (५५) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी मुलगा राहुल मनोहर बोरकर (३०) याला तातडीने अटक केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, राहुलला दारूचे व्यसन असून तो नेहमीच वडिलांसोबत वाद घालत असे. गुरुवारी रात्री पिता-पुत्रामध्ये जोरदार भांडण झाले. याच वादातून मद्यधुंद राहुलने घरातील लाकडी बल्लीने वडिलांच्या डोक्यावर आणि शरीरावर वर्मी घाव घातले. मनोहर बोरकर यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी जेव्हा राहुलचे आजी-आजोबा झोपेतून उठले, तेव्हा त्यांना मनोहर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

​घटनेची माहिती मिळताच राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट आणि डीबी स्कॉडचे प्रमुख हवालदार मनीष करपे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपी राहुलला बेड्या ठोकल्या. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व श्याम घुगे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

​तीन दिवसांतील दुसरी घटना
अमरावतीत गेल्या तीन दिवसांतील हा दुसरा खून आहे. दोन दिवसांपूर्वीच वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारतळेगाव येथे पत्नीने मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून त्याची हत्या केली होती. दारूच्या व्यसनामुळे उध्वस्त होणाऱ्या कुटुंबांची ही भीषण वास्तवता पुन्हा एकदा समोर आली आहे.

Web Title : अमरावती: बेटे ने नशे में पिता को लकड़ी से पीट-पीटकर मार डाला।

Web Summary : अमरावती में एक व्यक्ति ने नशे में अपने पिता को लकड़ी से पीट-पीटकर मार डाला। बेटे राहुल बोरकर को गिरफ्तार कर लिया गया है। यह क्षेत्र में शराब से संबंधित हिंसा का एक और हालिया मामला है, जो परिवारों पर व्यसन के विनाशकारी प्रभाव को उजागर करता है।

Web Title : Amravati: Son kills father in drunken rage with wooden stick.

Web Summary : In Amravati, a man killed his father with a wooden stick while intoxicated. Rahul Borkar, the son, was arrested. This follows another recent case of alcohol-related violence in the region, highlighting the devastating impact of addiction on families.