शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीतील गावात सायंकाळी भोंगा वाजला की बंद होतात मोबाइल, टीव्ही; राज्यभर 'या' गावाची का आहे चर्चा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:07 IST

Amravati : गावातील मुलं शिकली पाहिजे, या उद्दात्त हेतूने सरपंचाच्या संकल्पनेतून तालुक्यातील पिंपळखुटा गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : गावातील मुलं शिकली पाहिजे, या उद्दात्त हेतूने सरपंचाच्या संकल्पनेतून तालुक्यातील पिंपळखुटा गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. सायंकाळी ७ वाजता सायरनचा भोंगा वाजवून मोबाइल, टीव्ही बंद करून अभ्यासाला लागण्याची सूचना ग्रामस्थांना दिली जाते.

मोबाइल, टीव्हीच्या नादात भरकटलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा देण्यासाठी पिंपळखुटा ग्रामवासीयांनी दररोज सायंकाळी ७ वाजता मोबाइल आणि टीव्ही बंद करून सर्व मुलांना अभ्यासाला बसवण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे. हा उपक्रम रात्री नऊ वाजेपर्यंत केवळ दोन तास राबविला जातो. 'अभ्यासाचा भोंगा' उपक्रमामुळे गावातील मुला-मुलींमध्ये शिस्त, एकाग्रता व अभ्यासाची ओढ निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. 

ग्रामपंचायतीचा पुढाकार

गावचे सरपंच गजानन पडोळे, उपसरपंच, सदस्य तसेच शिक्षक यांच्या नेतृत्वाखाली या प्रेरणादायी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. याद्वारे पिंपळखुटा गाव अमरावती जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहेत.

गटविकास अधिकाऱ्यांनी केली खातरजमा

'अभ्यासाचा भोंगा' उपक्रमाची दखल गटविकास अधिकारी सुभाष पिल्लारे, विस्तार अधिकारी नितीन सुपलेसह पंचायत समिती शिक्षण विभागाच्या पथकाने या उपक्रमाची तपासणी केली. रात्री नियोजित दोन तासात घराघरांत मुलं-मुली अभ्यासात व्यस्त दिसले.

"पिंपळखुटा गावात रात्री ७ ते ९ या दोन तासात विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, उच्च विद्याविभूषित व्हावे, या उद्देशाने गावातील विद्युत खांबावर भोंगा लावून त्यामध्ये सायरन वाजवून ग्रामपंचायतीमधून सूचना दिल्या जाते. वेळीच सर्व ग्रामस्थ मोबाइल, टीव्ही बंद करून मुलांना अभ्यासाला बसवितात. हा उपक्रम कौतुकास्पद आहे."- सुभाष पिल्लारे, गटविकास अधिकारी

"मोबाइल, टीव्हीला बाजूला ठेवून ज्ञानाला प्राधान्य देणारा हा उपक्रम गावातील मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया मजबूत होत आहे."- गजानन पडोळे, सरपंच

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati Village Silences Mobiles, TVs for Evening Study Hour

Web Summary : Pimpal Khuta village inspires with evening siren for study time. Villagers switch off devices, fostering discipline and focus among students from 7-9 PM daily. The initiative, praised by officials, strengthens children's educational foundation, prioritizing knowledge.
टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण