कमी वजनाच्या बालिकेच्या आरोग्यात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:16 IST2021-08-27T04:16:48+5:302021-08-27T04:16:48+5:30

फोटो पी २६ पोहरा अमरावती : अवघे १ किलो ९०० ग्रॅम वजन, त्यात लघवीच्या ठिकाणी दुखरा अल्सर, ...

Improving the health of underweight girls | कमी वजनाच्या बालिकेच्या आरोग्यात सुधारणा

कमी वजनाच्या बालिकेच्या आरोग्यात सुधारणा

फोटो पी २६ पोहरा

अमरावती : अवघे १ किलो ९०० ग्रॅम वजन, त्यात लघवीच्या ठिकाणी दुखरा अल्सर, ताप अशा अवस्थेतील बालिकेवर योग्य उपचार, पालकांचे समुपदेशन, पाठपुरावा यामुळे पोहरा आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाधऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या बालिकेच्या आरोग्यात सुधारणा झाली असून, तिचे वजन सुमारे अडीच किलो झाले व ती सुखरूप आहे.

अंजनगाव बारी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पोहरा उपकेंद्रातील राजुरा येथील पारधी बेडा याठिकाणी वृषाली पवार या मातेस प्रसूतीसाठी संदर्भित करण्यात आले. पोहऱ्याचे डॉ. मंगेश पाटील यांनी बेड्यावर जाऊन नियमित गृहभेटी करून संस्थात्मक प्रसूतीसाठी या कुटुंबाचे समुपदेशन केले. त्यामुळे ही माता शासकीय रुग्णालयात दाखल झाली. मातेने बालिकेला जन्म दिला. मात्र, बाळाचे वजन फक्त १ किलो ९०० ग्रॅम इतकेच होते. त्यामुळे बाळाला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले. माता व मातेचे नातेवाईक बाळाला तिथे ठेवण्यास तयार नव्हते व शेवटी त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर घरी जाण्याची परवानगी मागितली.

त्यांनी जरी सुट्टी घेतली तरीही त्या बाळाचे प्राण वाचविणे ही जबाबदारी ओळखून डॉ. पाटील यांनी या कुटुंबाच्या घरी जाऊन समुपदेशन केले. बालकांचे संगोपन, दूध पाजण्याची पध्दत, आवश्यक स्वच्छता व काळजी याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. बाळाला सुती कापडात कसे गुंडाळावे, याबाबतही मार्गदर्शन केले.

बॉक्स

बेड्यावर संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढावे

चौथ्या दिवशी बाळाची तपासणी करताना लघवीच्या ठिकाणी दुखरा अल्सर झाल्याचे आढळून आले. त्यामुळे बाळाला ताप येणे साहजिक होते. त्यावर तत्काळ उपचार करण्यात आला. नवव्या दिवशी बाळाच्या तोंडात फोड आल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यावरही तत्काळ उपचार केल्याने बाळ बरे झाले. योग्य समुपदेशन व काळजीमुळे त्याच्या वजनात वाढ होऊन आजघडीला बाळाचे वजन २ किलो ४०० ग्रॅम एवढे झाले आहे. बेड्यावर संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढण्यासाठी सातत्याने जनजागृती होत असल्याची माहिती आरोग्यसेविका विजया बारसे यांनी दिली.

Web Title: Improving the health of underweight girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.