अँटी ऑक्सिडेंट्स आणि अँटिबॅक्टेरियल गुण ज्यामध्ये असतात, ते शरीरासाठी उपयुक्त असतात. हाडे मजबूत करणारे घटक घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. सकस आहार व व्यायाम केल्यास आजारापासून दूर राहण्यास मोठी मदत मिळते. रोगप्रतिकार शक्ती आजारांपासून दूर ठेवणारी ढालच आहे. आहार, व्यायाम व झोपेला महत्त्व देणाऱ्यांची प्रतिकारशक्ती उत्तम असते. कोरोनाकाळात रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्यासाठी लोकांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. तेव्हापासूनच त्याचे खरे महत्त्व कळून चुकले आहे.
-----------------–------------
कोट-
नियमित व्यायाम व सकस आहारासोबतच किमान सहा तास झोप हवी. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती बळकट राहून शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती खालावते.
- रसिका राजनेकर, आहारतज्ज्ञ, रिम्स हॉस्पिटल.
---------------------------------
* वयोगटानुसार झोपेचे तास-
1) ० ते ३ महीने - १४ ते १७ तास
2) ४ ते ११ महीने-12 ते 15 तास
3) १ ते २ वर्षे - ११ ते १२ तास
4) ३ ते ५ वर्षे - १० ते १३ तास
5) ६ ते १३ वर्षे - ९ ते ११ तास
6) १४ ते १७ वर्षे - ८ ते १० तास
7) १८ ते ६४ वर्षे - ७ ते ९ तास
8) ६५ वर्षांपुढील - ६ ते ८ तास
-------------------------------