आयएफएस झाले, पेढेही वाटले; पोस्टिंग मात्र नाहीच

By गणेश वासनिक | Updated: June 26, 2025 13:12 IST2025-06-26T13:11:03+5:302025-06-26T13:12:07+5:30

Amravati : आनंद क्षणभंगुर, भारतीय वनसेवेतील ४० अधिकाऱ्यांच्या बदल्या

IFS passed, man got a job; but no posting. | आयएफएस झाले, पेढेही वाटले; पोस्टिंग मात्र नाहीच

IFS passed, man got a job; but no posting.

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
राज्याच्या वनविभागात मनमर्जी कारभार हाकला जात असून, महिनाभरापूर्वी आयएफएस झालेल्या २७ वनाधिकाऱ्यांनी पेढे वाटले. मात्र, त्यांच्या पदरी निराशा पडली. मंगळवारी (दि. २४) ४० आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश धडकले. मात्र, यात २४ नव्या आयएफएस यांना पोस्टिंगसाठी ताटकळत ठेवण्याचा प्रकार घडला आहे.

राज्य शासनाच्या तन व महसूल विभागाने २४ जून रोजी महाराष्ट्रातील ४० आयएफएस अधिकाऱ्याच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत, यात संजीव गौड, विवेक खांडेकर या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना (दुय्यम) पदावर बढती मिळाली, तर यामध्ये ४ मुख्य वनसंरक्षक, ३ वनसंरक्षक आणि २७उपवनसंरक्षकांची पोस्टिंग देण्यात आली आहे. नागपूरच्या वनभवनात गत ३ वर्षापासून ठाण मांडून बसलेले अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार यांच्या खुर्चीमध्ये बदल करण्यात वनविभाग नापास ठरला, तर चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगांवकर यांना वर्षभरातच चंद्रपूरमधून हटविण्यात आले आहे. आयएफएस अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी चांगली पोस्टिंग मिळावी, यासाठी काही पदे अपग्रेड करण्यात आल्याचे या बदली यादीवरून दिसून येते.


२३ अधिकारी वेटिंगवर

  • चार वर्षापासून राज्य सेवेतील वनाधिकाऱ्यांना आयएफएस पोस्टिंग देण्यात आली नव्हती.
  • ५ वर्षाच्या कालावधीनंतर अखेर २७ वनाधिकाऱ्यांना आयएफएस अवॉर्ड मिळाले.
  • २ जून रोजी आदेश पारीत झाल्यानंतर २३ दिवसांनीसुद्धा पोस्टिंग देण्यात आलेली नाही.
  • ४० आयएफएस यांच्या बदल्यांच्या यादीत नव्याने आयएफएस झालेल्या २७ पैकी केवळ चार अधिकाऱ्यांना पोस्टिंग देण्यात आली असून, उर्वरित २३ अधिकारी वेटिंगवर आहेत.


अतिरिक्त पदांवर डोलारा

  • वनविभागात आरएफओ ते सीएफ अशी मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. १० अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कारभार असून, काहींना तर अतिरिक्त कार्यभार स्वतःकडे ठेवून कार्यमुक्त होण्याचे आदेश अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) विवेक खांडेकर यांनी काढले आहेत.
  • विवेक खांडेकर यांना प्रधान २ मुख्य वनसंरक्षक पदावर बढती दिल्यानंतरही त्यांच्याकडे कार्मिकच्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदाची जबाबदारी आहे. खांडेकर यांना कोण कार्यमुक्त करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वनविभागात पदे रिक्त ठेवण्यावर अधिक भर दिला जात आहे.


आयएफएस अधिकाऱ्यांची चलाखी

  • महाराष्ट्रात आयएफएस लॉबी बदली आणि पदोन्नतीमध्ये सुविधा बघत भावसे नियम १९६६ उपनियम क्रमांक ४ (२) चा योग्यरीत्या उपयोग करतात.
  • या बदली यादीमध्ये संजीव गौड यांच्यासाठी पद अपग्रेड केले असून, मुख्य वनसंरक्षक के. प्रदीपा, जितेंद्र रामगांवकर यांच्यासह वनसंरक्षक आशिष ठाकरे, डॉ. शिवबाला एन. आणि उपवनसंरक्षक विवेक हौशिंग, जी. गुरुप्रसाद, तुषार चव्हाण, कुलराज सिंह, कृष्णा भवर, आदिती भारद्वाज, लक्ष्मण पाटील, एन. जयकुमारन यांची सुविधा करण्यात आली, तर राज्य कॅडरची चार पदे कमी करण्यात आली आहेत.

Web Title: IFS passed, man got a job; but no posting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.