'तू जर कोणाला सांगितले तर तुला बेल्टने मारेन.. ' शिक्षकाने ओलांडली पदाची मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:03 IST2025-08-25T17:01:55+5:302025-08-25T17:03:37+5:30

म्हणे, पोत्यात भरून फेकून देईन : अचलपूर तालुक्यातील एका विद्यालयातील घटना

'If you tell anyone, I will beat you with a belt..' Teacher crosses the line | 'तू जर कोणाला सांगितले तर तुला बेल्टने मारेन.. ' शिक्षकाने ओलांडली पदाची मर्यादा

'If you tell anyone, I will beat you with a belt..' Teacher crosses the line

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
शाळेतील शिक्षकानेच एका १५ वर्षीय विद्यार्थिनीवर शारीरिक बळजबरी केल्याची धक्कादायक घटना अचलपूर तालुक्यातील एका गावात घडली. १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास घडलेल्या त्या घटनेप्रकरणी २२ ऑगस्ट रोजी तक्रार नोंदविण्यात याप्रकरणी आली. सरमसपुरा पोलिसांनी आरोपी शिक्षक रवींद्र (४९, रा. अभिनव कॉलनी, अचलपूर) (४९, रा. अभिनव कॉलनी, अचलपूर) याच्याविरुद्ध २२ ऑगस्ट रोजी रात्री बलात्कार, विनयभंग तथा धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला.


घटनेचे गांभीर्य ओळखून सरमसपुरा पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी रात्री ११:१७ च्या सुमारास आरोपी रवींद्र यास तातडीने अटक केली. अचलपूर तालुक्यातील एका गावाची रहिवासी असलेली १५ वर्षीय विद्यार्थिनी त्याच तालुक्यातील अन्य एका गावातील विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. १४ ऑगस्ट रोजी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली. दुपारी २ च्या सुमारास ती शिकत असलेल्या शाळेतील आरोपी शिक्षक रवींद्र वैराळे याने तिला शाळेच्या कार्यालयामागे असलेल्या खोलीत नेले. तेथे तिची छेड काढली तथा कमरेचा बेल्ट काढून तू जर कोणाला सांगितले तर तुला बेल्टने मारेन, तुला पोत्यात भरून आरेगाव येथे फेकून देईल अशी गर्भित धमकी दिली. त्यानंतर नराधम शिक्षक आरोपीने आपल्याच विद्यार्थिनीवर शारीरिक बळजबरी केली. 


आठवडाभरानंतर झाला घटनेचा उलगडा
१५ वर्षीय विद्यार्थिनीने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करत घर गाठले. मात्र घरी गेल्यानंतर पालकांना तो प्रकार नेमका कसा सांगावा, अशा विचारात ती पडली. मुलगी विचारमग्न असल्याचे तिच्या आईच्या नजरेतून सुटू शकले नाही. आणखी खोलात जाऊन विचारणा केली असता, तिच्यावर शिक्षकाकडून बळजबरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला. त्यानंतर तिच्या पालकांनी सरमसपुरा पोलिस ठाणे गाठले.
 

Web Title: 'If you tell anyone, I will beat you with a belt..' Teacher crosses the line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.