शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

चिडलेल्या प्रेमवीराने तरुणीला दिली अ‍ॅसिडहल्ल्याची धमकी; लग्नही मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 13:25 IST

फेब्रुवारी २०२० तरुणीचे लग्न ठरले. मार्चमध्ये ती अमरावतीला आल्यानंतर आरोपीने तिच्याशी वारंवार फोनवर संपर्क केला आणि लग्न व शारीरिक सुखाची मागणी करू लागला. एवढेच नव्हे तर...

ठळक मुद्देचेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकीएकतर्फी प्रेमातून युवकाचे कृत्यलग्नही मोडले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एका तरुणीला आरोपी युवकाने लग्नाची मागणी घातली. तिच्या सोयरिकीच्या ठिकाणी प्रेमसंबंधाची द्वाही देत होणारे लग्न मोडले आणि त्यानंतर अ‍ॅसिड टाकून चेहरा विद्रूप करेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

मोहम्मद अबरारउल हक (२८, रा. पॅराडाईज कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात एका तरुणीने शनिवारी पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार, ती अबरारला २०११ पासून ओळखते. ओळखीची व्यक्ती म्हणून त्याच्याशी ती बोलत होती. मात्र, त्याचा गैरफायदा घेत तिच्या घराभोवती त्याने चकरा घालण्यास सुरुवात केली. ती घराबाहेर पडली, की माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे तिला अडवून, हात पकडून तो म्हणायचा. मुलीने हा प्रकार भावाला सांगितला. त्याने युवकाला समज दिल्यानंतर अबरार २०१८ पर्यंत तिच्या वाटेला गेला नाही. मात्र, २०१८ मध्ये ती तरुणी बंगळुरुला असताना, अनोळखी क्रमांकावरून त्याने तिच्याशी संपर्क साधला. तुला अजून विसरलो नाही. तू जर माझ्याशी बोलली नाहीस, तर मी स्वत:चे बरेवाईट करून घेईन, अशी धमकी देऊन त्याने तिला बोलण्यास बाध्य केले.

फेब्रुवारी २०२० तरुणीचे लग्न ठरले. मार्चमध्ये ती अमरावतीला आल्यानंतर आरोपीने तिच्याशी वारंवार फोनवर संपर्क केला आणि लग्न व शारीरिक सुखाची मागणी करू लागला. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी तिचे लग्न ठरले, तेथे फोन करून कथित प्रेमसंबंधाची माहिती दिली. याप्रकरणी आरोपी मोहम्मद अबरारउल हक याच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड), ३४१, ५०६ अन्वये नोंदविला आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी