इन्स्टावर ओळख, न्यूड व्हिडीओ अन् बलात्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2023 21:01 IST2023-04-14T21:00:40+5:302023-04-14T21:01:51+5:30
Amravati News इन्स्टावर झालेली ओळख, बहरलेले प्रेमसंबंध आणि न्युड व्हिडीओ काढण्याच्या मालिकेदरम्यान एका तरूणीवर अकोला येथे बलात्कार करण्यात आला.

इन्स्टावर ओळख, न्यूड व्हिडीओ अन् बलात्कार!
प्रदीप भाकरे
अमरावती: इन्स्टावर झालेली ओळख, बहरलेले प्रेमसंबंध आणि न्युड व्हिडीओ काढण्याच्या मालिकेदरम्यान एका तरूणीवर अकोला येथे बलात्कार करण्यात आला. ११ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी १४ एप्रिल रोजी आरोपी रोशन संतोष देशमुख (रा. अकोला) याच्याविरूध्द बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, येथील एका तरूणीची इन्स्टाग्रामवर अकोल्यातील रोशन देशमुखशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ते प्रेमसंबंध बहरले. अशात ९ एप्रिल रोजी आरोपीने तिला एका ठिकाणी बोलावून शरीरसुखाची मागणी केली. त्यावेळी तिने नकार दिला. मात्र त्यावेळी आरोपीने तरूणीचे नग्न व्हिडीओ काढले. दरम्यान १३ एप्रिल रोजी सकाळी ती आरोपीला भेटायला अकोला येथे गेली. तेथील एका शिवारात रोशनने तिच्यावर शारीरिक बळजबरी केली. तेव्हा देखील आरोपीने आपले नग्न व्हिडीओ काढले असावेत, अशी शक्यता तरूणीने तक्रारीतून व्यक्त केली आहे. त्यावेळी पिडिताने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे फसगत झालेल्या त्या तरूणीने १४ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास राजापेठ पोेलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.