अमरावती : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, मानवमुक्तीचे प्रणेते, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शनिवारी राजकीय, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांच्यावतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत इर्विन चौकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हारार्पण करुन नतमस्तक होण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली होती. यावेळी इर्विन चौकाला यात्रेचे स्वरूप आले होते. आंबेडकरी अनुयायी पांढरी वस्त्रे परिधान करुन इर्विन चौकात जमले होते. याठिकाणी लावण्यात आलेल्या आंबेडकरी विचारधारेच्या पुस्तकांच्या स्टॉल्सवरही अनुयायांची गर्दी दिसून आली. कडक उन्हात भर दुपारी महिला, पुरुष, युवक, युवती आणि आबालवृद्धांनी रांगा लाऊन महामानवाला आदरांजली वाहिली.
आई म्हणे लेकराला..हो तू भीमा सारखा...
By admin | Updated: December 6, 2014 22:38 IST