लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वरुड तालुक्यातील एका आश्रमशाळेतील १५ वर्षे नऊ महिने वयाच्या विद्यार्थिनीला गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी वरुड पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी आरोपी राहुल रामुजी युवनाते (२७, रा. तिवसा घाट, ता. वरुड) याच्याविरुद्ध बलात्कार व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. ११ सप्टेंबर रोजी रात्री ११:२५ च्या सुमारास त्याला अटक देखील करण्यात आली.
१ मे ते २५ जूनदरम्यान लैंगिक अत्याचाराची ती घटना घडली. वरुड येथील एका शेतात कुटुंबीयांसोबत राहणारी ती मुलगी वरुड येथील एका आश्रमशाळेत राहून तेथेच शिक्षण घेते. दरम्यान, उन्हाळ्याच्या सुट्टीत ती आईकडे आली असता २५ जून रोजी ती तिच्या आजोबाचा डबा घेऊन शिवारात गेली होती. तेथून परत येत असताना आरोपी राहुल याने तिला अडविले. तू मला आवडतेस असे म्हणून त्याने तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. आरोपीने तिला जबरदस्तीने एका नदीच्या बाजूला नेऊन तिच्यावर शारीरिक बळजबरी केली. याबाबत वाच्यता केल्यास तिला मारण्याची धमकी देखील देण्यात आली. भीतीपोटी ती बाब तिने पालकांना सांगितली नाही.
१६ वर्षीय मुलीवर शारीरिक बळजबरी
चिखलदरा तालुक्यातील एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दिले. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी करण बेठेकर (२२, रा. कोटमी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
कुटुंबीयांसमक्ष बयाण
दरम्यानच्या काळात ती आश्रमशाळेत परतली. ९ सप्टेंबर रोजी तिच्या शाळेत विद्यार्थिनींचे रुटिन चेकअप सुरू असताना तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे निदान करण्यात आले. त्यामुळे ती बाब वरुड पोलिसांना सांगण्यात आली. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांसमक्ष तिचे बयाण नोंदविले त्यावेळी आरोपी राहुल याने तिच्यावर अत्याचार केल्याची बाब उघड झाली.