‘मी उद्योगिनी’ १७ एप्रिलला
By Admin | Updated: April 15, 2015 00:13 IST2015-04-15T00:13:18+5:302015-04-15T00:13:18+5:30
सखींच्या स्वयंउद्योगांना चालना मिळावी या हेतूने स्वयंरोजगाराचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.

‘मी उद्योगिनी’ १७ एप्रिलला
अमरावती : सखींच्या स्वयंउद्योगांना चालना मिळावी या हेतूने स्वयंरोजगाराचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम १७ एप्रिल रोजी यशवंत लॉन, मूक-बधिर शाळेजवळ, अकोली रोड, साईनगर, अमरावती येथे दुपारी ३ वाजतापासून सुरू होणार आहे.
या कार्यक्रमात सखी व इतर सर्व महिला करीत असलेल्या कोणत्याही उद्योगाचे स्टॉल लावू शकतात. सखींच्या मनोरंजनासाठी ‘वन मिनीट गेम शो’ व विविध गुणदर्शनांचाही कार्यक्रम होणार आहे. स्टॉल लावण्यासाठी सखींना १०० रूपये तर इतर महिलांना १५० प्रवेश शुल्क आकारण्यात येईल. स्टॉल नोंदणीसाठी महिलांना सखी संयोजिका स्वाती बडगुजर (९८५०३०४०८७), ज्योती वैद्य (९४०३०५१५२४), भारती क्षीरसागर (९४२३६२२४७९), शुभांगी मोहिते (९४२१७८८९९१) यांच्याशी संपर्क साधता येईल. (प्रतिनिधी)