शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

हवाला रकमेचे ‘हैदराबाद’ कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 5:00 AM

सूत्रांनुसार, १५ सप्टेंबर २०२० मध्ये हैदराबाद पोलिसांनी बंजारा हिल्स भागात दोन वाहनांमधून ३.७५ कोटी रुपये जप्त केले होते. त्यावेळी चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते. रकमेची वाहतूक आपण कमलेश शहा यांच्या सूचनेनुसार करीत होतो, अशी कबुली त्या चौघांनी दिली होती. अटकेतील आरोपी हे अहमदाबाद येथील कमलेश शहा यांच्या बंजारा हिल्स शाखेचे कर्मचारी असल्याचे तेथील हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनीकुमार यांनी स्पष्ट केले होते.

ठळक मुद्देदोन्ही घटनांमधील संशयित ‘कॉमन’, पोलीस करणार समांतर तपास, तेथे ३.७५ कोटी जप्त

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ पोलिसांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’दरम्यान जप्त केलेल्या ३.५० कोटींच्या व्यवहाराचे ‘स्ट्रॉंग गुजरात कनेक्शन’ उघड झाले होते. आता ‘हैदराबाद कनेक्शन’ पोलीस दप्तरी नोंदविले गेले. गुरुवारी हैदराबाद पोलिसांकडून राजापेठ पोलिसांना विस्तृत ‘टेलिफोनिक’ विचारणा करण्यात आली. अमरावतीत पकडले गेलेले हवाला रकमेशी संबंधित अहमदाबादेतील इसम हे हैदराबाद  येथे पकडण्यात आलेल्या हवाला कांडाशी संलग्न असल्याची माहिती पलीकडून देण्यात आली. त्यामुळे की काय, पोलिसांनीही आयकर विभागासह ‘पॅरेलल’ तपासाची परवानगी मागणारा अर्ज न्यायालयात सादर केला आहे. सूत्रांनुसार, १५ सप्टेंबर २०२० मध्ये हैदराबाद पोलिसांनी बंजारा हिल्स भागात दोन वाहनांमधून ३.७५ कोटी रुपये जप्त केले होते. त्यावेळी चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते. रकमेची वाहतूक आपण कमलेश शहा यांच्या सूचनेनुसार करीत होतो, अशी कबुली त्या चौघांनी दिली होती. अटकेतील आरोपी हे अहमदाबाद येथील कमलेश शहा यांच्या बंजारा हिल्स शाखेचे कर्मचारी असल्याचे तेथील हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनीकुमार यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी आरोपींचा बाॅस म्हणून कमलेश शहा यांचे नाव उघड झाले होते. अमरावतीत पकडलेल्या  रकमेवर अहमदाबाद येथील कमलेश शहा यांनीच दावा केल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली. जे पत्र देण्यात आले, त्यात ती रक्कम नीना कमलेश शहा यांच्या प्रोप्रायटर फर्मची असल्याचे म्हटले आहे. कमलेश शहा हे नाव दोन्ही प्रकरणात  ‘कॉमन’ आहे. म्हणून अमरावती पोलीस हैदराबाद पोलिसांकडून दहा महिन्यांपूर्वीची माहिती मागविणार आहेत.

दहशतवादी कारवायात हवालाचा पैसा?मुंबईत जुलै २००७ मध्ये झालेला बॉम्बस्फोट, गुजरातमधील २००८ मध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासाठी  दहशतवाद्यांना हवालामार्फत पैसा पुरवण्यात आल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात समोर आले होते. दहशतवादविरोधी पथकाकडून सन २०१४ मध्ये दहशतवादी कारवायांसंदर्भात सुरू असलेल्या तपासात, मुंबईतील २००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी हवालामार्फत दहशतवाद्यांना पैसा आल्याची माहिती मिळाली होती. गुटखा व्यावसायिकांच्या माध्यमातून हा हवाला चालत असल्याचेही आढळून आले होते.

काय आहे हवाला?हवाला म्हणजे सोप्या शब्दात गॅरंटी! आर्थिक व्यवहारात ‘हवाला’ म्हणजे पैसे देण्याघेण्याची व्यवस्था. हे प्रकरण केवळ विश्वासाच्या अलिखित करारावर चालते. फार पूर्वी जेव्हा बँका अस्तित्वात नव्हत्या, आधुनिक करप्रणाली अस्तित्वात नव्हती तेव्हा हवाला राजमान्य होता. त्यानंतर पेढ्यांमध्ये हुंडीवर पैसे मिळण्याची सोय झाली. त्यानंतर हवाला आपोआप बेकायदेशीर झाला.

 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सPoliceपोलिस