शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

जगायचे कसे? सरकारी डॉक्टर नावाला; आता तर अडचण दोन वेळच्या जेवणाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने बहुतांश शासकीय कार्यालयाचा डोलारा कंत्राटी कर्मचारी सांभाळत आहेत.  आरोग्य विभागही त्याला अपवाद नाही.  राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून कंत्राटी स्वरूपात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची भरती केली जाते.  सद्यस्थिती जिल्ह्यात ३०० डॉक्टर आणि ९००  कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत . मात्र अनेकदा जिल्हा परिषदेला वेळेवर अनुदान उपलब्ध होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे मानधन उशिरा होत असल्याची स्थिती आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांची अनेक पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहे.  मात्र मानधन उशिरा होत असल्याने कर्मचारी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे  मानधन वेळेवर द्यावे अशी मागणी कर्मचारी होत आहे.रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने बहुतांश शासकीय कार्यालयाचा डोलारा कंत्राटी कर्मचारी सांभाळत आहेत.  आरोग्य विभागही त्याला अपवाद नाही.  राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून कंत्राटी स्वरूपात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची भरती केली जाते.  सद्यस्थिती जिल्ह्यात ३०० डॉक्टर आणि ९००  कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत . मात्र अनेकदा जिल्हा परिषदेला वेळेवर अनुदान उपलब्ध होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे मानधन उशिरा होत असल्याची स्थिती आहे.  नियमित कर्मचारी पेक्षा कमी मानधनावर काम करत असल्याने वेळेवर मानधन मिळावे अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने ही अडचन होत असल्याचे सांगण्यात आले.

कंत्राटी ३०० डॉक्टर ९०० कर्मचारी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात ३०० डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली आहे. तसेच ९०० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने मानधनावर कार्यरत आहेत.त्यात औषध निर्माण अधिकारी, परिचारिका, कार्यक्रम सहाय्यक, समुपदेशक डेंटल असिस्टंट, तंत्रज्ञ अशा विविध  पदांचा समावेश आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानात गत काही वर्षापासून कंत्राटीतत्वावर घेतले जात आहे.

दोन महिन्यांपर्यंत थकीत राहते मानधन-    यावेळी अनुदान मिळाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांची एप्रिल महिन्याचे मानधन अदा केली असल्याचे लेखा व्यवस्थापकांनी सांगितले.  -    मात्र अनुदान  न आल्यास दोन महिन्यापर्यंतचे मानधन थकते.

जिल्हा परिषदेला अनुदान मिळेना

१ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेला अनुदान मिळण्यास विलंब होतो.  त्यामुळे मानधन उशिरा होतात.२ केंद्राकडून राज्याला अनुदान मिळते. त्यानंतर जिल्हा परिषदेला अनुदान पाठवले जात असल्याने विलंब होतो.

जगायचे कसे?

यावेळी एप्रिल महिन्याचे मानधन वेळेवर मिळाले आहे.  मात्र, अनेकदा मानधन उशिरा मिळते.  त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. मानधन वेळेवर मिळाली पाहिजे. - कंत्राटी परिचारिका

मानधनाशिवाय इतर सुविधा नाहीत.  त्यामुळे मानधन वेळेवर मिळावे, अशी अपेक्षा आहे, तसेच शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी आमची मागणी आहे.- कंत्राटी लिपिक

अनुदान प्राप्त झाल्यानंतर त्वरित कर्मचाऱ्यांचे मानधन दिले जाते.  अनुदान प्राप्त झाल्यामुळे एप्रिल महिन्याचे मानधन अदा करण्यात आले आहे.- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

११ महिन्यांचा करार, मानधन नियमित नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचा करार अकरा महिन्यांसाठी असतो.  त्यातही मानधन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसते. कोरोना काळात आरोग्य सेवा बजावलेल्यांना शासकीय सेवेत कायम करावे, अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

 

टॅग्स :doctorडॉक्टर