शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

कोरोनात परीक्षा ऑफलाईन कशी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 5:00 AM

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पालकांची चिंता वाढली आहे. ऑफलाईन परीक्षांदरम्यान शारीरिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळले जातील. परीक्षांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे गोसावी यांनी स्पष्ट केले. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्या ऑनलाईन घेण्यात येतील, अशा अफवा सोशल मीडियावर पसरत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये चिंता, दहावी-बारावीच्या केंद्रांवर होणार परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल महिन्यात इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये तूर्तास कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यासंदर्भात सुरू असलेल्या अफवांवर पालक, विद्यार्थी, शिक्षकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पालकांची चिंता वाढली आहे. ऑफलाईन परीक्षांदरम्यान शारीरिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळले जातील. परीक्षांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे गोसावी यांनी स्पष्ट केले. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्या ऑनलाईन घेण्यात येतील, अशा अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. मात्र, यात कोणतेही तथ्य नसल्याची बाब शिक्षण मंडळाने स्पष्ट केली आहे.

दहावीतील पालकांच्या प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांच्या अकाऊंट, गणित यासारख्या विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अवघड होणार आहे. त्यामुळे परीक्षा पद्धत, गुण पद्धतीत मंडळाने बदल करण्याचा विचार होणे आवश्यक आहे. त्याचा विचार व्हावा.- मीनाक्षी देशपांडे, पालक

विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव, विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय या साऱ्यांचा विचार करूनच नियोजन करायला हवे. कोरोना संसर्गाने सर्वांनाच मानसिक तणाव झेलावा लागत आहे. - रोशन चव्हाण, पालक

वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुलांसह आम्हीही प्रचंड तणावात आहोत. शाळा सुरू नसल्याने आपण इतराच्या तुलनेत कमी गुण मिळवू, अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय निवडायला हवा.- तेजस्विनी आखरे, पालक.

शिक्षण मंडळाने परीक्षांचे नियोजन करताना ५० टक्के शाळांकडे, ५० टक्के ऑफलाईन परीक्षा यांच्यामार्फत करायला हरकत नाही. यापेक्षा सहज, सोपा इतर पर्याय असेल, तर त्याचाही विचार तातडीने करायला हवा.- रवि शर्मा, पालक

ऑनलाईनने विद्यार्थ्यांचा ६० टक्केच अभ्यासक्रम झाला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वंकष विचार करून मंडळाने मूल्यमापनाची पद्धती अवलंबवायला हवी. याच अभ्यासाच्या आधारे मंडळाने प्रचलित पद्धतीचा हट्ट न धरता परीक्षेचे नियोजन करावे.- प्रीती डोंगरे, पालक

बारावीच्या परीक्षा ऑनलाईन हव्या. एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेतल्यास गुणांचे नियोजन अवघड होणार आहे, याची आम्हाला जाणीव आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याविषयी विचार करावा.- अर्चना उके, पालक

ऑनलाईन परीक्षांचा पर्याय असावापरीक्षा ऑनलाईन घ्यायला हव्या होत्या, असे मत ६८.३ टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने आतापर्यंत केवळ २१ टक्के विद्यार्थ्यांनी ४० ते ५० टक्के स्वत:च अभ्यास केल्याचे कबूल केले आहे.  यंदा शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली आहे. या अभ्यासक्रम कपातीसंदर्भात ५१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. प्रचलित परीक्षेपेक्षा आराखडा बदलून ५० टक्के गुण बोर्डाने शाळेतील अंतर्गत मूल्यमापन, तर ५० टक्के लेखी परीक्षेस ठेवावे, असे पालकांचे मत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याexamपरीक्षा