शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

‘डेल्टा प्लस’चा संसर्ग कसा रोखणार? दोन्ही डोस घेणारे केवळ पाच टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून पाच टप्प्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरणाची मोहीम मंदावली. अर्धेअधिक केंद्र बंदच राहतात. शहरातील केंद्रांवर गर्दी राहत असल्यामुळे नागरिक पहाटेपासून रांगा लावतात. या आठवड्यात सर्वाधिक मागणी असलेल्या कोविशिल्डचा ठणठणाट असल्याने शनिवारी स्टॉक उपलब्ध होताच पुन्हा रांगा लागल्या.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात १६ टक्के लसीकरण, आता तिसऱ्या लाटेचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा  उत्परिवर्तन झालेल्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये लसीकरण सर्वांत प्रभावी आहे. जिल्ह्यात मात्र आतापर्यंत २१ टक्केच लसीकरण झाले आहे. यात पहिला डोस घेणारे १६ टक्के व दुसरा डोस घेणारे फक्त ५ टक्केच नागरिक आहेत.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून पाच टप्प्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरणाची मोहीम मंदावली. अर्धेअधिक केंद्र बंदच राहतात. शहरातील केंद्रांवर गर्दी राहत असल्यामुळे नागरिक पहाटेपासून रांगा लावतात. या आठवड्यात सर्वाधिक मागणी असलेल्या कोविशिल्डचा ठणठणाट असल्याने शनिवारी स्टॉक उपलब्ध होताच पुन्हा रांगा लागल्या.जिल्ह्यात आजपर्यंत फक्त ६,४६,०१३ नागरिकांचेच लसीकरण व ६,५७,०४० लसींचा पुरवठा करण्यात आला. यात ५,०६,३३० कोविशिल्ड तर १,५०७१० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १०२ केंद्र आहेत. यात १९ केंद्रे  महापालिका क्षेत्रातील आहेत. ऑनलाईन नोंदणी करताना स्लाॅट मिळत नाही. अगदी दोन मिनिटांत तेथील कोटा फुल्ल होत आहे. पुन्हा नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने हा कंटाळवाणा ‘फास्टेट फिंगर’चा खेळ ठरला आहे.

१८ ते ४४ गटात फक्त तीन टक्केच

- १८ ते ४४ वयोगट फार महत्त्वाचा असताना या गटात आतापर्यंत ८४,३१२ नागरिकांचेच लसीकरण झाले आहे. यात पहिला डोस ७३,४१४ व दुसरा डोस फक्त १०,८९८ नागरिकांनीच घेतला.- या गटात कोविशिल्डचे १,७६,८६५ व कोव्हॅक्सिनचे १०,८९८ नागरिकांचे लसीकरण झाले असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

ज्येष्ठ नागरिकांचे सर्वाधिक लसीकरणजिल्ह्यात पाच वर्गवारीत लसीकरण होत असले तरी यात सर्वाधिक लसीकरण ज्येष्ठ नागरिकांचे झालेले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पहिला डोस १,७२,१८६ व दुसरा डोस ७२,९२४ ज्येष्ठ नागरिकांनी घेतल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. सुरुवातीला याच वर्गासाठी होत असलेले लसीकरण संथ झाले होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस