अमरावतीच्या धारणीजवळ भीषण अपघात! पिकअप दरीत कोसळली; ४ ठार, ८ गंभीर जखमी

By प्रदीप भाकरे | Updated: February 22, 2026 21:55 IST2026-02-22T21:54:56+5:302026-02-22T21:55:41+5:30

अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार

Horrific accident near Dharani in Amravati as Pickup falls into valley 4 killed 8 seriously injured | अमरावतीच्या धारणीजवळ भीषण अपघात! पिकअप दरीत कोसळली; ४ ठार, ८ गंभीर जखमी

अमरावतीच्या धारणीजवळ भीषण अपघात! पिकअप दरीत कोसळली; ४ ठार, ८ गंभीर जखमी

प्रदीप भाकरे, धारणी (अमरावती): धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. शिवाझरी ते राणीगांव दरम्यान, नारुदू गावाजवळ प्रवाशांनी भरलेली पिकअप ६० ते ७० फूट खोल दरीत कोसळल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कंजोली आणि राणीगांव येथील १५ ते २० ग्रामस्थ मध्य प्रदेशातील देडतलाई येथील बाजार आटोपून आपल्या गावी परतत होते. नारुदू गावाजवळील घाट उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रिव्हर्स जाऊन थेट दरीत कोसळले. या भीषण अपघातात कंजोली येथील एक महिला आणि तीन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सर्व मृतदेह आणि जखमींना तातडीने धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. धारणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title : अमरावती: धारणी के पास पिकअप घाटी में गिरी; 4 की मौत

Web Summary : अमरावती के धारणी के पास, यात्रियों से भरी एक पिकअप घाटी में गिर गई, जिसमें चार लोगों की मौत हो गई और आठ गंभीर रूप से घायल हो गए। घाट रोड पर ड्राइवर ने नियंत्रण खो दिया। घायलों को स्थानीय अस्पताल ले जाया गया, पुलिस जांच कर रही है।

Web Title : Amravati: Pickup Truck Falls into Valley Near Dharni; 4 Dead

Web Summary : Near Dharni, Amravati, a pickup truck carrying villagers crashed into a valley, killing four and seriously injuring eight. The driver lost control on a ghat road. The injured were rushed to a local hospital, and police are investigating.

टॅग्स :Accidentअपघात