अमरावती जिल्ह्यात धुवाधार पाऊस, विश्रोळी धरणाचे नऊ दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 13:33 IST2022-07-18T12:57:09+5:302022-07-18T13:33:06+5:30
धरणाचे पाणी नदीपात्रात असले तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यात धुवाधार पाऊस, विश्रोळी धरणाचे नऊ दरवाजे उघडले
अमरावती : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून धुवांधार पाऊस कोसळत आहे. विश्रोळी येथील धरणाचे ९ दरवाजे २० सेंटीमीटर उघडण्यात आले आहे. धरणाचे पाणी नदीपात्रात असले तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सावरखेड येथे पुर्णा नदीचे पाणी गावात शिरले आहे. तळेगाव दशासर परिसरात ६ वाजतापासून मुसळधार पाऊस, आताही पाऊस कायम आहे. धारणी तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात नदी, नाले ओसंडून वाहत आहे. चार तालुक्यात अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. अचलपूर शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बिछन नदी दुथडी भरून वाहत आहे. दिया येथील सिपना नदीला एका आठवड्यात तिसऱ्यांदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
तळेगाव दशासर येथील मोती कोळसा नदीला महापूर नदी काठच्या शेतीला फटका शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली
आली आहे. घाट लाडकी ते अंबाडा रोड वरील पुल कोसळला आहे.