लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात नवीन इमारत सुरू झाल्यापासून मेळघाटातून रुग्ण रेफरचे प्रमाण वाढीस लागले आहे, तर दुसरीकडे सहजतेने गर्भवती महिलेची प्रसूती होऊ शकते तरीही डफरीनमध्ये पाठविले जाते. कारण सिझेरियनसाठी डॉक्टरांना 'एनएचएम'मधून इन्सेटिव्ह मिळत असल्यामुळे हा प्रकार वाढीस लागल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.
मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय असा आरोग्य यंत्रणेचा भला मोठा डोलारा आहे. गर्भवती महिलेची प्रसूती सहजतेने होऊ शकते तरीही थेट अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण रेफरचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे.
याविषयी चौकशी केल्यास बरेच तथ्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती आहे. महिलेची प्रसूती अमरावतीत, तर मेळघाटातील डॉक्टरांचे 'इन्सेटिव्ह' राष्ट्रीय आरोग्य मिशनमधून काढण्याचा प्रकार सुरू आहे. मेळघाटातून रुग्ण अमरावतीत रेफरचे ऑडिट केल्यास यातील वास्तव समोर येईल, अशी माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सातत्याने सुरू असल्याचे चित्र आहे.
गरीब, सामान्य गर्भवती महिलेची हेळसांड का?मेळघाटात प्रत्येक उपकेंद्राला समुदाय आरोग्य अधिकारी देण्यात आले, पण ते मुख्यालय राहतच नाही. त्यामुळे रुग्ण रेफरचे प्रमाण वाढले आहे. मेळघाटात समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र तसेच अचलपूर येथे स्त्री रुग्णालय असताना गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. मात्र डॉक्टरांकडून हा प्रकार सुरू आहे.
डफरीनमध्ये प्रसूतीसाठी रेफर रुग्णवर्ष आलेले रुग्ण प्रसूती२०२१-२०२२ ९०९ ३४०२०२२-२०२३ ५४४ १६२२०२३-२०२४ ५८६ १७३२०२४-२०२५ ४३८ १४९
"पूर्वीपेक्षा अलीकडे मेळघाटातून गर्भवती महिलांना अमरावतीत रेफर करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. साधारणतः प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्ण अधिक येतात. वरूड, मोर्शी येथूनही प्रसूतीसाठी रुग्ण पाठविले जातात. दरमहा सरासरी किती रुग्ण रेफर केले जातात, ही आकडेवारी तूर्तास सांगता येणार नाही."- डॉ. विनोद पवार, अधीक्षक डफरीन, अमरावती