शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

आरोग्य मंत्र्यांकडून मेळघाटच्या आरोग्य यंत्रणेची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 8:24 PM

राज्यस्तरीय जंतनाशक मोहिमेला मेळघाटातून प्रारंभ; नेब्युलायझरचे वितरण

चिखलदरा/धारणी (अमरावती) : मेळघाटमधील आरोग्य व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यंत्रणेसह मेळघाट दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी सकाळी सेमाडोहपासून या दौऱ्याला प्रारंभ झाला. हरिसाल या पहिल्या डिजिटल गावातून राज्यस्तरीय जंतनाशक मोहिमेला आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ झाला. लहान मुलांच्या श्वसनासंबंधी संसर्गावर प्रभावी ठरलेले नेब्युलायझर यंत्राचे प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरण आणि नागरिकांना सकस धान्यवाटपही यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.सर्व विभागांच्या साहाय्याने कुपोषणावर मात करीत मेळघाटातील बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मोहीम राबविण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शासनाकडून आरोग्यसेवक, आशा सेविका, ग्रामसेवक, शाळा यांच्या माध्यमातून गावोगाव कुपोषण निर्मूलनासाठी पोषक आहार, आरोग्य जागृती, सुसज्ज आरोग्य केंद्रे याबरोबरच टेलिमेडिसीन, मोटरबाइक, अ‍ॅम्ब्यूलन्स असे उपक्रम राबवले जात आहेत. कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य, महिला व बालविकास, ग्रामविकास आदी विभागांच्या समन्वयातून संयुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.             आरोग्यमंत्र्यानी सेमाडोह, हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्यातील प्रत्येक वॉर्ड, औषधी भांडार, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवास यांची पाहणी केली व तेथील अधिकारी- कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी आदी उपस्थित होते.

भूमकाकडे नको, दवाखान्यात आणा आरोग्यमंत्री शिंदे यांनी वॉर्डात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. आपल्या बालकाला किंवा घरातील आजारी व्यक्तीला भूमकाकडे नेऊ नका. दवाखान्यातच आणा. येथेच त्यांच्यावर चांगले उपचार होतील, असेही त्यांनी रुग्णांना सांगितले. मेळघाटात काम करणाऱ्या आशा सेविका रुग्णांना भूमकाकडे जाऊ न देता, त्यांचे मन वळवून त्यांना दवाखान्यात आणत असतात. एका रुग्णाला दवाखान्यात घेऊन येणाºया व स्वत: आजारी पडलेल्या माखला या गावातील आशा सेविका ललिता मावसकर यांच्याशीही आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधला. आरोग्यमंत्र्यांनी नियोजित दौऱ्यात ऐनवेळी बदल करून बैरागड या अतिदुर्गम गावाला भेट दिली. यादरम्यान त्यांनी गावाची पाहणी केली व तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAmravatiअमरावती