शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

खापरखेडा येथे आरोग्य विभागाच्या उपाययोजना सुरू

By admin | Updated: September 20, 2014 23:42 IST

खापरखेडा येथील डायरियाचे थैमान अखेर आटोक्यात आले आहे. कॅम्पमध्ये ३५ रूग्ण, कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रूग्णालयासह इतर ठिकाणी एकूण ८० गॅस्ट्रोने बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

राजेश मालवीय - धारणीखापरखेडा येथील डायरियाचे थैमान अखेर आटोक्यात आले आहे. कॅम्पमध्ये ३५ रूग्ण, कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रूग्णालयासह इतर ठिकाणी एकूण ८० गॅस्ट्रोने बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अतिगंभीर अवस्थेतील आदिवासी महिला जानकी पटेल (३५) हिला पुढील उपचारार्थ अमरावती येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ‘खापरखेड्यात डायरियाचे थैमान, चिमुकली दगावली’चे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच त्याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी आसोले, पंचायत समितीचे बीडीओ जोशी, पाणीपुरवठा उपअभियंता, १० वैद्यकीय अधिकारी, २० आरोग्य सेवक-सेविका, जिल्हा साथरोग अधिकारी, शिघ्र प्रतिसाद पथकासह गावात डेरेदाखल असून कॅम्पमधील ३५ रूग्णांसह इतर रूग्णांवर तातडीचे उपचार सुरू आहेत. दोन हजार लोकवस्तीच्या खापरखेड्यात चार सार्वजनिक विहिरीतून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, ग्रामसचिव मालसच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांपासून विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात न आल्याने गावात दूषित पाणीपुरवठा सुरू होता. अशा दोन विहिरींना व पाण्याच्या टाकीला सील ठोकण्यात आले आहे. नजीकच्या दाबिदा येथून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात ६० अवैध नळ कनेक्शन असून नळाच्या ठिकाणी असलेले खड्डे शनिवारी बुजविण्यात आले आहेत. गावात साफसफाई व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी व आरोग्य विभागाची चमू औषधी साठ्यासह खापरखेडा येथे तळ ठोकून आहेत. अतिसाराच्या रुग्णांवर आवश्यक औषधोपचार आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. डायरियाने बाधित चिमुकलीचा नाहक बळी गेल्याने यासाठी जबाबदार ग्रामसचिवावर जिल्हा प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्याने आदिवासींनी तीव्र संताप व्यक्त केला.