शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांचे समायोजन होणार

By admin | Updated: January 9, 2017 00:09 IST

मुख्याध्यापकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेने अखेर वेग घेतला आहे. पात्र मुख्याध्यापकांचे समायोजन सोमवार १६ जानेवारीला जिल्हास्तरावर करण्यात येणार असून ...

१६ जानेवारीचा मुहूर्त : सीईओंनी दिले आदेशअमरावती : मुख्याध्यापकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेने अखेर वेग घेतला आहे. पात्र मुख्याध्यापकांचे समायोजन सोमवार १६ जानेवारीला जिल्हास्तरावर करण्यात येणार असून राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.आरटीई २००९ तसेच पटनिर्धारणानुसार तयार करण्यात आलेल्या सन २०१६-१७ च्या संचमान्यतेनुसार मुख्याध्यापकांचे समायोजन करण्याचे आदेश शिक्षण विभागाद्वारा देण्यात आले. उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर राहण्याकरिता सेवाज्येष्ठता तथा बिंदुनामावलीनुसार पात्र ठरलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन प्रथम तालुकास्तरावर करण्यात येणार आहे. समायोजन करण्यापूर्वी १८ मे २०११ व २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयान्वये प्राधान्यक्रम ठरवून समायोजनाची यादी प्रसिद्ध करावी, असे कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उक्त शासन निर्णयातून मान्यताप्राप्त जिल्हास्तरीय शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, सेवानिवृत्तीला पाच वर्षे कालावधी शिल्लक असलेले शिक्षक, अपंग- मतिमंद व्यक्ती किंवा अशा मुलांचे पालक असलेल्या कर्मचाऱ्यांना वगळू नयेत. समुपदेशनाद्वारे सेवाज्येष्ठतेनुसार प्रथम प्राधान्य देत त्यांचे शक्यतोवर तालुक्यांतर्गत समायोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पंचायत समितीस्तरावर १२ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून संपूर्ण तपशील शिक्षण विभागाला कळवावा लागणार आहे. १६ जानेवारीला दुपारी १ वाजता भातकुली पंचायत समितीच्या सभागृहात समायोजनाची प्रक्रिया राबविण्याचे आदेश सीईओ कुलकर्णी यांनी दिले असून यानुसार ही प्रक्रिया होणार आहे. (प्रतिनिधी)