फेसबुकवरून त्यांची झाली ओळख.. पुढे तिला बोलावून लॉजमध्ये कोंडले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 10:36 PM2020-09-20T22:36:15+5:302020-09-20T22:37:33+5:30

फेसबुकवरून ओळख झालेल्या एका मुलीला पंढरपूर येथील दोन युवकांनी एका महिलेच्या मदतीने अमरावती येथून अकोला येथे नेऊन तेथील बसस्थानकानजीक एका लॉजमध्ये कोंडल्याचा धक्कादायक प्रकार २२ ऑगस्ट रोजी घडला होता. या गुन्ह्याचा तपास अमरावती शहरातील एका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

He was introduced on Facebook .. I called her later and locked her in the lodge ... | फेसबुकवरून त्यांची झाली ओळख.. पुढे तिला बोलावून लॉजमध्ये कोंडले...

फेसबुकवरून त्यांची झाली ओळख.. पुढे तिला बोलावून लॉजमध्ये कोंडले...

Next
ठळक मुद्देतिघांविरुद्ध गुन्हाअमरावती पोलिसांकडे तपास वर्ग




लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : फेसबुकवरून ओळख झालेल्या एका मुलीला पंढरपूर येथील दोन युवकांनी एका महिलेच्या मदतीने अमरावती येथून अकोला येथे नेऊन तेथील बसस्थानकानजीक एका लॉजमध्ये कोंडल्याचा धक्कादायक प्रकार २२ ऑगस्ट रोजी घडला होता. या गुन्ह्याचा तपास अमरावती शहरातील एका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

प्रकरणाची फिर्याद एका महिलेने यवतमाळ पोलिसांत नोंदविली होती. त्यावरून एक महिला व दोन अनोळखी युवकांविरुद्ध यवतमाळ पोलिसांनी भादंविचे कलम ३६३, ३४२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला होता. तिच्या नात्यातील अमरावती येथील अल्पवयीन मुलीची फेसबुकवरून पंढरपूर येथील रहिवासी असलेल्या आरोपींशी ओळख झाली. त्यांनी अमरावती एमआयडीसीहून अल्पवयीन मुलगी व आणखी एका मुलीसह अकोला गाठले. आरोपींनी एका लॉजमध्ये बंद करून ठेवल्याची माहिती मुलीनेच फिर्यादीला फोनवरून दिली होती. यवतमाळ पोलिसांनी मुलीची सुटका केली होती. या प्रकरणाचा तपास आता अमरावती पोलिसांकडे शनिवारी वर्ग करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.




 

Web Title: He was introduced on Facebook .. I called her later and locked her in the lodge ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.