लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : देशभर उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्ण वातावरणामुळे माणसांप्रमाणे जंगलातील वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे. पाण्यासाठी त्यांची भटकंती हृदय हेलावणारी ठरली आहे. अशातच जंगलातील एक हातपंप वन्यप्राण्यांसाठी जीवनदायी ठरला आहे. रस्त्याने ये-जा करणारे नागरिक माकडांसह इतर प्राण्यांसाठी हातपंप हापसून पाणी काढतात. माकडेही कशाची भीती न बाळगता कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी निडरपणे येऊन तहान भागवतात. चिखलदरा-धारणी-परतवाडा मार्गावर घटांग फाट्यावर हे चित्र सदोदित दिसते.उन्हाळ्यात गावखेड्यांसह शहरी भागात ठिकठिकाणी पाणेरी लावल्या जातात, तर चिमण्या पाखरांसाठी सूज्ञ नागरिक घरापुढे मातीच्या किंवा अन्य एखाद्या भांड्यात पाणी आणि धान्य टाकून ठेवत असल्याचे चित्र सर्वविदित आहे. मात्र, जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत.जीवनदायी हातपंप नैसर्गिक स्रोत आटले असताना घटांग फाटा येथील हातपंप रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांसाठी लक्षवेधी ठरला आहे. त्या हातपंपातील थंडगार स्वच्छ पाणी अनेकांच्या घशाची कोरड शमवितो.प्राण्यांची कणवघटांग फाटा येथील या हातपंपाजवळ वड, पिंपळसह विविध प्रजातींचे वृक्ष आहेत. त्यामुळे येथे हे माकडांची संख्या लक्षणीय आहे. लोनाझरी (मसोंडी) येथील हिरुजी गायन व सुरेश खडके याच रस्त्याने गावी जात असताना त्यांना पाण्यासाठी आसुसलेली काही माकडे दिसली. त्यांनी हातपंप हापसून त्यांची तहान भागवली. परतवाडा-इंदूर मार्गाने जाणारे प्रवासीदेखील हाच कित्ता गिरवतात.
वन्यप्राण्यांसाठी ‘ते’ हापसतात हातपंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:15 IST
देशभर उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्ण वातावरणामुळे माणसांप्रमाणे जंगलातील वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे. पाण्यासाठी त्यांची भटकंती हृदय हेलावणारी ठरली आहे. अशातच जंगलातील एक हातपंप वन्यप्राण्यांसाठी जीवनदायी ठरला आहे.
वन्यप्राण्यांसाठी ‘ते’ हापसतात हातपंप
ठळक मुद्देमाणुसकीचा झरा । मेळघाटातील घटांग फाटा