लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका निवडणुकीत उमेदवारांना शुक्रवारी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे कालावधी होता. मात्र युवा स्वाभिमान पार्टीने स्वतंत्रपणे उभे केलेल्या ४१ पैकी १२ उमेदवारांनी माघार घेतली असून २९ उमेदवार रिंगणार कायम आहे. दरम्यान आज सकाळी फार्म हाऊसवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप नेत्यांनी रवी राणांची भेट घेतली मात्र ते नमले नाही. भाजप नेत्यांनी अक्षरशः पायघड्या घातल्या परंतु त्यांनी माघार घेतली नाही. यावरून भाजपची अवस्था लक्षात येथे. युवा स्वाभिमानच्या या उमेदवारांचा थेट फटका भाजपलाही बसणार आहे. दरम्यान आज सकाळी फार्म हाऊसवर भाजप नेत्यांनी रवी राणांची भेट घेतली असली तरी युवा स्वाभिमानचे उमेदवार रिंगणात कायम असल्याने ही भेट केवळ राणांच्या फार्महाऊसला भेट देण्याइतपत ठरली. तीन जागांवर भाजपने युवा स्वाभिमानला बिनशर्त पाठींबा दिला, इतकी नामुश्की भाजपवर का आली, याचे उत्तर पालकमंत्रीच देऊ शकतील.
तीन उमेदवारांना चिन्ह देऊ नये; भाजपचे पत्र
अमरावती महापालिका निवडणुकीत अनवधानाने तीन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आला. शैलेश राऊत, गौरव बान्ते, मृणाल चौधरी यांना 'कमळ' हे निवडणूक चिन्ह देऊ नये, असे पत्र भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. पत्राला उशीर झाल्याने चिन्ह कायम राहिले आहे.
भाजप-वायएसपीचे बंदद्वार चर्चेतून निर्णय
- महापालिका निवडणुकीत ज्या प्रभागात १ भाजपचा उमेदवार सक्षम असतील, तेथे युवा स्वाभिमान मदत करणार आहे.
- ज्या प्रभागात युवा स्वाभिमानचे उमदेवार सक्षम असतील, त्या ठिकाणी भाजप सहकार्य करेल.
- एकंदर भाजप-वायएसपींचे 'एकमेका साह्य ३ करू..' असाच अमरावती महापालिका निवडणुकीत प्रवास असणार आहे.
या भाजप नेत्यांची होती बैठकीला उपस्थिती
आ. रवी राणांच्या फार्म हाऊसवर भाजप नेत्यांना जावे लागले. यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रवीराज देशमुख, संजय तिरथकर, संजय शिरभाते आदींचा समावेश आहे.
Web Summary : Minister's withdrawal marks victory for Ravi Rana. Despite BJP leaders' efforts, Rana's candidates remain in the fray for municipal elections. BJP supports Rana in three areas, highlighting their weakened position.
Web Summary : मंत्री के पीछे हटने से रवि राणा की जीत हुई। भाजपा नेताओं के प्रयासों के बावजूद, राणा के उम्मीदवार नगरपालिका चुनावों में बने रहे। भाजपा ने तीन क्षेत्रों में राणा का समर्थन किया, जिससे उनकी कमजोर स्थिति उजागर हुई।