शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

पालकमंत्र्यांनी ठेवले तिष्ठत नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:09 AM

शासकीय कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, तीन तासानंतरही ते आले नाहीत. अखेर आ. यशोमती ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उपरोधिक भूमिपूजन पार पाडले. विरोधी पक्षातील आमदाराच्या मतदारसंघातील भूमिपूजनाला पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली, असा आरोप आमदार यशोमती ठाकूर आणि समर्थकांनी केला.

ठळक मुद्देवलगावात राजकीय नाट्य : विकास आराखड्यातील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव विकास आराखड्यांतर्गत मंजूर झालेल्या १ कोटी ४० लक्ष रुपये खर्चाच्या वलगाव येथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणी कामाचे सोमवारी दुपारी गावातीलच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या शासकीय कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, तीन तासानंतरही ते आले नाहीत. अखेर आ. यशोमती ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उपरोधिक भूमिपूजन पार पाडले. विरोधी पक्षातील आमदाराच्या मतदारसंघातील भूमिपूजनाला पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली, असा आरोप आमदार यशोमती ठाकूर आणि समर्थकांनी केला.वलगाव येथील पेढी नदीवर असलेल्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या निर्वाणभूमीच्या विकासासाठी आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांतून तत्कालीन काँग्रेस सरकारने ४० कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा मंजूर केला होता. या आराखड्यात नवीन बस स्थानकाचा समावेश करण्यात आला. सोमवारी सकाळी १० वाजता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन ठरविण्यात आले. आ. ठाकूर वेळेत पोहोचल्या; मात्र पालकमंत्री दुपारी १ पर्यंत उपस्थित झाले नाहीत. ते दुपारी २ पर्यंत भूमिपूजनाला येतील, असा निरोप जिल्हाधिकाऱ्यांकरवी पोहचविण्यात आला. मात्र, प्रतीक्षा करून आधीच ग्रामस्थ कंटाळले होते, त्यात पावसाचे वातावरण असल्याने गावातीलच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. आपण काँग्रेसच्या आमदार असल्याने सत्ताधीशांनी आपली अडवणूक चालविली असून, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा दम आ. यशोमती ठाकूर यांनी भूमिपूजनानंतर भरला. भूमिपूजन फलकावर उपस्थित म्हणून परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खा. नवनीत राणा, आ. सुनील देशमुख, आ. श्रीकांत देशपांडे, आ. प्रवीण पोटे, आ. अरुण अडसड, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांची नावे आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलेल्या या भूमिपूजनामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक