पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, नेहरू मैदानावर कुठलेही बांधकाम होणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:35 IST2025-10-14T16:32:15+5:302025-10-14T16:35:54+5:30
Amravati : या वादात माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनीदेखील उड़ी घेत नेहरू मैदानावरील प्रस्तावित बांधकामाला विरोध दर्शविला.

Guardian Minister Bawankule said, no construction will be done on Nehru Maidan
लोकमत न्यूज नेटवर
अमरावती : अमरावतीच्या ऐतिहासिक नेहरू मैदानावर कुठलेच बांधकाम होणार नाही. नेहरू मैदान, दसरा मैदान, सायन्सकोर मैदान अशी सारी शहरातील मैदाने कायम राखण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर - बावनकुळे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे
या मैदानाच्या स्वच्छतेचा आणि संवर्धनाचा कार्यक्रम भाजपाच्यावतीने लवकरच हाती घेतला जाणार आहे. ना. - बावनकुळे यांच्या मते, नेहरू मैदान हे ऐतिहासिक आणि वैभवशाली ठिकाण आहे. ज्या परिसरात महानगरपालिकेच्या जुन्या इमारती आहेत, त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या माध्यमातून नवीन विकास आराखडा राबविण्यात येईल, असे त्यावेळी आयुक्तांच्या बैठकीत सांगितले होते, ही बाब पालकमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केली. नेहरू मैदानाचे दुरुस्ती व सौंदर्याकरणही करण्यात येणार असून, ते अत्याधुनिक असेल, अशी भावना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
रविवारी अमरावती भाजपाने पत्रकार परिषद घेऊन नेहरू मैदानावर अमरावती महापालिकेची इमारत उभारण्याला आपला प्रखर विरोध जाहीर केला होता. पालकमंत्र्यांचा संदर्भ देऊन नेहरू मैदानावर इमारत बांधण्याच्या वृत्तातील फोलपणा आता स्पष्ट झाल्याचेही भाजपजनांनी स्पष्ट केले. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आग्रही भूमिका घेतली.
दुध का दुध, पानी का पानी
दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या आमदार खोडके दाम्पत्यांनी नेहरू मैदानावर महापालिकेची इमारत बांधण्यात येईल, असा पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय झाला, असा दावा केला होता. तथापि, पालकमंत्री बावनकुळे यांनी नेहरू मैदानविषयी भूमिका स्पष्ट केल्यामुळे 'दूध का दूध, पानी का पानी' झाले.