शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

अल्पवयीन विद्यार्थिनीला मद्य पाजून सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 6:00 AM

रविवारी पीडित मुलगी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर घरी परत येत असताना त्या ओळखीच्या युवकाने तिच्या इच्छेविरुद्ध तिला दुचाकीवर बसविले. यासाठी त्याच्या एका मित्राने मदत केली. तिघेही एकाच दुचाकीने निघाले. एका घरात तिला नेण्यात आले. तेथे दोन्ही मित्रांनी दारू ढोसली. त्यांनी त्या मुलीलाही मद्य पिण्यास बाध्य केले. यानंतर दोन्ही आरोपी मुलीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.

ठळक मुद्देप्रजासत्ताक दिनाची घटना एकाला अटक दुसरा फरार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इयत्ता अकरावीत शिकत असलेल्या १५ वर्षीय विद्यार्र्थिनीला दोन युवकांनी मद्य पाजून सामूहिक अत्याचार केल्याची घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी ११.३० च्या सुमारास शहरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. दुसरा आरोपी पसार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दोन्ही आरोपी पीडिताच्या घराजवळ राहत असल्याची माहिती पुढे आली आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीची १९ वर्षीय आरोपीसोबत एक महिन्यापूर्वी ओळख झाली. रविवारी पीडित मुलगी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर घरी परत येत असताना त्या ओळखीच्या युवकाने तिच्या इच्छेविरुद्ध तिला दुचाकीवर बसविले. यासाठी त्याच्या एका मित्राने मदत केली. तिघेही एकाच दुचाकीने निघाले. एका घरात तिला नेण्यात आले. तेथे दोन्ही मित्रांनी दारू ढोसली. त्यांनी त्या मुलीलाही मद्य पिण्यास बाध्य केले. यानंतर दोन्ही आरोपी मुलीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास पीडितेला तिच्या घरापासून काही अंतरावर सोडून देण्यात आले. घटनेची वाच्यता केल्यास परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकी त्या दोघांनी मुलीला दिली. घाबरलेल्या मुलीने मोठ्या हिमतीने हा प्रकार तिच्या बहिणीला सांगितला. दुसऱ्या दिवशी सोमवारी पीडिताने संबंधित ठाण्यात अत्याचाराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी एका आरोपी युवकाला अटक केली. दुसरा आरोपी फरार आहे. त्याच शोध पोलीस घेत आहेत.दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (३), ३७६ (डी, ए), ३२३, ३४२, ५०६ तसेच पोक्सो ४, ६ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अधिकारी करीत आहेत.प्रजासत्ताक दिनी दोन आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडिताने दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवून एका आरोपीला अटक केली. दुसऱ्याचा शोध सुरू आहे.पोलीस अधिकारी, अमरावती शहरदोघांविरुद्ध यापूर्वी गुन्ह्याची नोंददोन्ही आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. यापूर्वी दोघांविरुद्ध वाटमारीचे कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Rapeबलात्कारStudentविद्यार्थी