अमरावती : शिक्षणमहर्षी पु.ना. उपाख्य नानासाहेब देशमुख यांना पीपल्स वेलफेअर सोसायटीच्यावतीने पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करण्यात आले. सोहळ्याला अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक प्रामुख्याने उपस्थित होते. पीपल्स वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्ष वसुधा देशमुख, संस्थेचे प्रशासकीय संचालक एस.एन. देशमुख, सचिव अभय देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य स्वप्निल देशमुख, वसुधाताई देशमुख कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय देशमुख, कृषी विज्ञान केंद्र घातखेडाचे प्राचार्य अतुल कळसकर, पाटबंधारे विभागाचे माजी अभियंता देशमुख, माजी प्राचार्य भास्करराव देशमुख, जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य मलवार, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक कानडे, साहित्यिक विजया डबीर, प्रशासकीय संचालक प्राचार्य जीवनराव देशमुख याप्रसंगी उपस्थित होते. संचालन इंग्रजी विभागप्रमुख विनय वसुले व आभार प्रदर्शन मराठी विभागप्रमुख प्राध्यापक अजय खडसे यांनी केले. प्राचार्य वनिता चोरे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संगीत विभागाच्या चमूने गिरीश शहाणे यांच्या मार्गदर्शनात स्वागतगीत सादर केले.
नानासाहेब देशमुख यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:16 IST