शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:16 IST

राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती रविवारी उत्साहात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांनी साजरी करून त्यांना अभिवादन केले. यावेळी इर्विन चौक स्थित डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात तप्त उन्हातही गर्दीला उधाण आले होते, हे विशेष.

ठळक मुद्देइर्विन चौकात गर्दीला उधाण : सामाजिक संघटना, राजकीय पक्षांतर्फे डॉ.आंबेडकरांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती रविवारी उत्साहात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांनी साजरी करून त्यांना अभिवादन केले. यावेळी इर्विन चौक स्थित डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात तप्त उन्हातही गर्दीला उधाण आले होते, हे विशेष.शनिवारी मध्यरात्री १२ वाजता येथील इर्विन चौक, भीमटेकडी, बडनेरा नवीवस्ती अशोकनगर, समता चौकातील पुतळा परिसरात फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर करून ‘जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात इर्विन चौकात गर्दी झाली होती.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे पक्ष्यांसाठी जलपात्राचे वाटप करण्यात आले. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, संत कबीर आदी समाज प्रबोधनकारांच्या विचारांचे ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होते. पंचशील, निळे झेंडे, गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेल्या प्रतिमांची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात झाली. डॉ. आंबेडकर, गौतम बुद्ध यांचे छायाचित्र अंकित असलेली माळ, लॉकेट, साखळी, हातबेल्ट, मूर्ती आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहचावे यासाठी, पीपल्स सोशल इस्टिट्युशनतर्फे प्रबोधन, संजय आठवले व सुरेंद्र सुखदेवे यांच्याकडून मसाला भातचे वाटप, डॉ.बी.आर. मेडिकोज असोसिएशन व विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालयाकडून रोगनिदान शिबिर, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेच्यावतीने नास्ता, पाणी वाटप आणि डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त केक कापण्यात आला. अ‍े.अ‍े.अंतर समूहतर्फे दारू मुक्ती समुपदेन, भारतीय स्टेट बँक कर्मचारी संघटनतर्फे शरबत वाटप, आदिवासी विकास परिषदेचे पाणी वाटप, नगरसेवक अजय गोंडाने यांच्याकडून पुरी भाजी वाटप, गंगामाई शिक्षण प्रसारक संस्थेकडून मसालभात व शीतपेय वाटप, महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका व सम्यक पुरूष गटाच्यावतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, महाराष्ट्र राज्यकर राजपत्रित अधिकारी, कर्मचारी संघ आणि वस्तू व सेवाकर यांच्यावतीने शिरा वाटप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोशिएनतर्फे सरबत वााटप करण्यात आले. दरम्यान युवतींनी काढलेल्या बुलेट रॅलीने लक्ष वेधून घेतले.यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, पोलीस आयुक्त संजय बावीस्कर, महापौर संजय नरवने, आमदार रवि राणा, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख, सिनेट सदस्य प्रफुल्ल गवई, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख, मनीष गवई, प्रदीप खेडकर, संतोष बनसोड आदींनी बाबासाहेबांना अभिवादन केले.एकता रॅली आयोजन समितीच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंती सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन सेवानिवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्र्वर मुळे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी भारतीय जन संविधान मंचेचे अध्यक्ष पारस ओसवाल होते. स्वागताध्यक्ष संजय पमनानी होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन, राजू नन्नावरे हे होते. यावेळी विश्र्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव, साहित्यरत्न, सेवा गौरव, विधी रत्न पुरस्काराने मान्यवरांंना गौरविण्यात आले.रविवारी उशिरा सायंकाळपर्यंत इर्वीन चौकात महानगराच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी समुदायांचे जत्थेच्या जत्थे आपल्या मुक्तीदात्याला रॅलीद्वारे अभिवादन करण्यासाठी आल्याचे चित्र होते.